घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:31 AM2021-04-06T04:31:09+5:302021-04-06T04:31:09+5:30

वाशी : शहरातील नागरिकांचे आरोग्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने घनकचरा हटविण्यासाठी नव्याने पाच घंटागाड्या शहरात दाखल झाल्या आहेत. मात्र, अद्याप त्याचा ...

The question of solid waste management is on the agenda | घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर

घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर

googlenewsNext

वाशी : शहरातील नागरिकांचे आरोग्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने घनकचरा हटविण्यासाठी नव्याने पाच घंटागाड्या शहरात दाखल झाल्या आहेत. मात्र, अद्याप त्याचा लोकार्पण सोहळा झालेला नसल्यामुळे घंटागाड्या धूळखात उभ्या आहेत. यासोबतच घनकचरा साठविण्यासाठी नगरपंचायतीच्या मालकीची जागाही उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या गावालगत असलेल्या भांडवले वस्तीनजीकच्या खासगी जागेत घनकचरा साठविण्यात आलेला आहे. घनकचऱ्याचे व्यवस्थापन सुरक्षितपणे होत नसल्यामुळे नागरिकांच्या, बालकांच्या आरोग्यासह पशुधनाचा प्रश्न उद्‌भवण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

शहराची लोकसंख्या २५ हजारांच्या आसपास असून, शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. नगरपालिकेच्या वतीने शहरातील ओला व सुका कचरा साफसफाई कामगाराच्या माध्यमातून जमा करण्यात येत आहे. हा कचरा जमा करण्याचे काम नगरपंचायतीने ठेका पद्धतीने दिलेले आहे. त्यामुळे ठेकदाराच्या माध्यमातून शहरातील मुख्य रस्त्यावरील घनकचरा झाडलोट करून जमा करण्यात येतो व सध्या खासगी वाहनातून भांडवले वस्तीनजीक असलेल्या खासगी शेतकऱ्याच्या शेतात नेऊन टाकण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी कचऱ्याचा मोठा ढीग जमा झालेला आहे. ज्या ठिकाणी कचरा टाकण्यात येतो, त्या ठिकाणीच जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. त्यामुळे या कचऱ्यामुळे या भागात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरणा विद्यार्थ्यांना बागडावे लागत आहे.

शहरतील नाले सफाईसाठी ठेकेदाराने इतर जिल्ह्यातून मजूर आणले असून, त्यांच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात येत आहे. मुख्य रस्त्यावरील स्वच्छता ही नियमितपणे होत असली, तरी इतर भागांतील नाल्या कायम तुंबलेल्या अवस्थेत पाहावयास मिळतात, याशिवाय या भागातील झाडलोटही कधीतरी होत असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनाच आपल्या भागातील स्वच्छता ठेवावी लागत आहे. अनेक भागांतील नाल्याचे पाणी वाहते होत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीच्या आजारांनाही निमंत्रण मिळत आहे.

चौकट...

कचऱ्याची सोय इतरत्र कचरा

बाजारसमितीकडून भांडवले वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या शेतात शहरातील घनकचरा मोठ्या प्रमाणात टाकण्यात आला आहे. या कचऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पशुधनाचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने हा कचरा इतरत्र साठविण्याची सोय करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी यांनी पत्राद्वारे प्रशासनाकडे केली आहे.

कोट......

घनकचरा साठविण्यासाठी नगरपरिषदेकडे सध्या स्वमालकीची जागा उपलब्ध नाही. जागा विकत घेण्यासाठी सात ते आठ शेतकऱ्यांचे प्रस्ताव दाखल असून, ते जिल्हा स्तरावर प्रलंबित आहेत. शासनाचा दर आणि स्थानिक दर याच्यात तफावत असल्यामुळे जागा मिळण्यास अडचणी येत आहेत, परंतु हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. नव्याने दाखल झालेल्या घंटागाड्यांची अद्याप पासिंग होणे बाकी आहे. ही प्रक्रियाही लवकरच पूर्ण करून त्या ठेकेदाराकडे सुपुर्द करण्यात येतील.

- गिरीश पंडित, मुख्याधिकारी

Web Title: The question of solid waste management is on the agenda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.