ई-पीक पाहणी नोंदविण्यात अडथळ्यांची शर्यत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:10 AM2021-09-02T05:10:44+5:302021-09-02T05:10:44+5:30
शेतकऱ्यांना स्वत: आपल्या शेतातील पिकांची सातबारावर नोंद करण्यासाठी ई-पीक या नावाने ॲप आणले. महसूल खात्यातील तलाठी, मंडल अधिकारी शेतकऱ्यांना ...
शेतकऱ्यांना स्वत: आपल्या शेतातील पिकांची सातबारावर नोंद करण्यासाठी ई-पीक या नावाने ॲप आणले. महसूल खात्यातील तलाठी, मंडल अधिकारी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी या ॲपमध्ये आपल्या पिकांची माहिती कशी नोंदवायची, याबाबत मार्गदर्शनही करीत आहेत. मात्र, नाेंदणीसाठीची पद्धत अत्यंत किचकट आहे. हे ॲप ओपन केल्यानंतर खातेदाराची निवड केल्यानंतर सांकेतिक क्रमांक टाकून पिकाची नोंद करताना गट क्रमांक, सर्व्हे नंबर, पिकाचे नाव, सिंचनाचा प्रकार, पीक लावल्याची तारीख यांसारखी अन्य माहिती संपूर्ण नोंदविली असली तरी ज्यावेळेस फोटो अपलोड करायचा असतो. सदरील फाेटाे काढल्यानंतर ताे अपलोड करण्यासाठी ॲपमध्ये पुढील पर्यायच लवकर येत नाही. परिणामी संपूर्ण प्रक्रिया करूनही पिकाची नाेंद हाेत नाही. परिणामी संबंधित शेतकऱ्यास संपूर्ण प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागते. उपराेक्त अडचणी तातडीने दूर करण्याची गरज आता शेतकऱ्यांतून व्यक्त केली जाऊ लागली आहे.
चाैकट...
मुदत वाढविण्याची मागणी...
ई-पीक पाहणीसाठी असलेली साईट वारंवार ठप्प हाेत आहे. परिणामी नव्याने खातेदाराची निवड करून सांकेतिक क्रमांक मिळवावा लागतो. परत सर्व कृती केल्यावर शेवटी जेव्हा पिकाचा फोटो अपलोड करायचा असतो, तेव्हा हीच समस्या उद्भवत असल्याने पिकांची नोंद होत नाही. शेतकरी या किचकट प्रक्रियेला कंटाळून ई-पीक पाहणी नोंदविणे टाळत आहेत. त्यामुळे नाेंदणीसाठीची मुदत वाढवावी, अशी मागणी हाेत आहे.