उमरग्यात भक्ती काव्याचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:27 AM2021-07-25T04:27:05+5:302021-07-25T04:27:05+5:30
कवीजन तुम्ही या हो। विठ्ठल नाम मुखी घ्या हो।। या काव्य गायनाने सिंधूताई रणखांब यांनी सहभागी कवींचे स्वागत केले. ...
कवीजन तुम्ही या हो।
विठ्ठल नाम
मुखी घ्या हो।।
या काव्य गायनाने सिंधूताई रणखांब यांनी सहभागी कवींचे स्वागत केले. साहित्य सेवा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर झिंगाडे यांनी प्रास्ताविकात
मनी भावभक्ती
तुझी रे विठ्ठला।
तुझ्या दर्शनाची
कसोटी पणाला।।
ही भक्ती गझल सादर केली.
आषाढी कार्तिकी
भक्तांचा हा मेळा...
या स्वलिखित अभंगाचे गायन विश्वनाथ महाजन यांनी केले.
तनाला मनाला
तुझी आस देवा।
मला जोजवी हा
तुझा श्वास देवा।।
ही भक्ती गझल डॉ. विनोद देवरकर यांनी सादर केली.
या संमेलनात गुंडू दुधभाते, डॉ. विनोद देवरकर, प्रा. शिवराम आडसुळे, प्रा. जागृती निखारे, डॉ. सुधीर निखारे,जयश्री देशपांडे, सुनीता महाबळ, सरिता कोठावले, अनुराधा कुलकर्णी, काशिनाथ बिराजदार, दत्ता काजळे आदींनी सहभाग नोंदवला. भक्ती कवितांच्या विठ्ठल गजरात वातावरण भारावून गेले.
विठ्ठल असा
माझा उपकारी।
आम्ही भक्त
तुझे सेवेकरी।।
या काव्य गायनाने व्यंकटेश रणखांब यांनी संमेलनाची सांगता केली. प्रा. शिवराम आडसुळे यांनी आभार मानले.