उस्मानाबादेत पावसाच्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:41 AM2021-04-30T04:41:51+5:302021-04-30T04:41:51+5:30
स्पीकरद्वारे जनजागृती उस्मानाबाद - काेराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन भूम तालुक्यातील पाथरूड येथे जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. सध्या ...
स्पीकरद्वारे जनजागृती
उस्मानाबाद - काेराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन भूम तालुक्यातील पाथरूड येथे जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. सध्या ग्रामपंचायतीच्या वतीने स्पीकरद्वारे माध्यमातून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अभ्यंगतांची संख्या ओसरली
उस्मानाबाद -काेराेनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन कामाशिवाय अभ्यंगतांनी जिल्हा परिषद इमारतीत येऊ नये, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांनी केले आहे. तसेच कर्मचारी उपस्थिती ही १५ टक्क्यांपर्यंत खाली आणली आहे. त्यामुळेच की काय, सध्या अभ्यंगतांची संख्या ओसरली आहे.
नाेंदी ठेवणे बंधनकारक
उस्मानाबाद - जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागात आजवर आठ ते नऊ कर्मचारी काेराेना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सध्या कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नाेंद ठेवण्याचे फर्मान काढले आहे. त्याची काटेकाेर अंमलबजावणी सुरू आहे.
भारनियमन रद्द करा
उस्मानाबाद - सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे अनेक गावात पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. भारनियमनाच्या काळात टंचाई अधिक तीव्र हाेते. ही बाब लक्षात घेऊन भारनियमन रद्द करण्यात यावे, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.