पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:39 AM2021-09-10T04:39:56+5:302021-09-10T04:39:56+5:30

जून महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावली. या महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकरी पेरणीला लागला. जुलै महिन्यातही अधूनमधून पाऊस पडत राहिला. ...

Rainfall exceeds annual average | पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी

पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी

googlenewsNext

जून महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावली. या महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकरी पेरणीला लागला. जुलै महिन्यातही अधूनमधून पाऊस पडत राहिला. मात्र, ऑगस्ट महिन्यापर्यंतही जिल्ह्यातील बहुतांश भागात म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत होता. मात्र, तीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. अनेक महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. त्यामुळे चिंतेत असलेला शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. मान्सूनमध्ये जून ते सप्टेंबर कालावधीत ६०३.१ मि. मी. पाऊस अपेक्षित आहे. अद्यापपर्यंत ६१४.८ मि. मी. पाऊस झाला आहे. त्याची टक्केवारी १०१.९ इतकी आहे. भूम, तुळजापूर, परंडा, उमरगा, वाशी तालुक्यांत शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस झाला तर उस्मानाबाद, कळंब, लाेहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाळा संपण्यापूर्वी हे तिन्ही तालुकेही वार्षिक सरासरी ओलांडण्याची शक्यता आहे.

कोणत्या तालुक्यात किती पाऊस

तालुके झालेला पाऊस टक्केवारी

उस्मानाबाद ६३६.६ मि. मी ८३.८

तुळजापूर ६५३ मि. मी. १००.१

परंडा ४७२.५ मि. मी. १२६.४

भूम ५८० मि. मी. १३२.४

कळंब ६३०. मि. मी. ८३.४

उमरगा ५६५ मि. मी. ११७.४

लोहारा ५४४ मि. मी. ९७.२

वाशी ६४१.२ मि. मी. ११०.३

चौकट...

कृषी विभागाने खरिपासाठी ४ लाख ९७ हजार ७४ हेक्टर प्रस्तावित केले होते. पावसामुळे ५ लाख ५१ हजार २९९ हेक्टरवर पेरणी झाली. याची टक्केवारी १११ इतकी आहे. या क्षेत्रापैकी ३ लाख ८४ हजार १३६ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. १९ हजार ९४४ हेक्टरवर मूग, ५६ हजार ३७३ हेक्टरवर उडीद, ६६ हजार ६४७ हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड झाली आहे. ज्वारी, मका, बाजरी, कापूस, तीळ, भुईमुगाचा पेरा झाला आहे.

ऑगस्ट महिन्यात तीन आठवडे पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होता. मागील चार दिवसात झालेल्या पावसामुळे काहीअंशी दिलासा मिळाला. काही भागात अतिवृष्टी झाल्याने शेतात पाणी साचून राहिले. त्यामुळे काढणीला आलेला उडीद, मूग ही पिके पाण्याखाली गेली आहेत. या पिकांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Rainfall exceeds annual average

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.