शेतकरी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी रामजीवन बोंदर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:31 AM2021-08-29T04:31:30+5:302021-08-29T04:31:30+5:30
बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट तर महीला आघाडी प्रदेशाध्यक्षा सीमा नरोडे, राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांची ...
बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट तर महीला आघाडी प्रदेशाध्यक्षा सीमा नरोडे, राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध समस्यावर चर्चा झाल्यानंतर मराठवाडा विभागीय अध्यक्ष म्हणून रामजीवन बोंदर यांची निवड करून प्रदेशाध्यक्ष घनवट यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. याशिवाय संघटनात्मक बांधणी, शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात अध्यक्ष अनिल घनवट यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीस प्रा .मारूती कारकर, ॲड. नेताजी गरड, लातूर युवक जिल्हाध्यक्ष रूपेश संके, नांदेडचे विठ्ठल गवळी, बीडचे परमेश्वर पुसुरे, अहमदनगरचे विठ्ठल शेळके, चंद्रकांत भराटे, संतोष राठोड, संजय वाघ, भरत पाटील, सुशीलकुमार पाडोळे, सिध्देश्वर सुरवसे, महेश गव्हाणे, दत्ता पाटील, जयाबाई राठोड, शिवाजीराव काळे, बाळासाहेब बोंदर आदी उपस्थित होते.
चौकट...
विविध विषयावर मंथन
शेतकरी संघटनेच्या बैठकीत शेतकऱ्यांची सध्याची स्थिती, समस्या यासह पीक विमा, केंद्रांने लादलेले तीन कायदे, ऊस गाळपाची रक्कम एफआरपीप्रमाणे अदा न करणे आदी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. एफआरपीप्रमाणे देयके न देणाऱ्या कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याचे यावेळी ठरले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नूतन मराठवाडा अध्यक्ष रामजीवन बोंदर यांनी दिली.