कलदेव निंबाळा येथे रानभाजी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:37 AM2021-08-17T04:37:41+5:302021-08-17T04:37:41+5:30
अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता पावशेरे तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव होते. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी ...
अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता पावशेरे तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव होते. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव यांनी केले. उमेद तालुका अभियान व्यवस्थापक विवेक पवार, बाबासाहेब नाईक, मंडळ कृषी अधिकारी श्याम खंडागळे, मंडळ कृषी अधिकारी डी. डी. भालेराव, आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रतिज्योत गरजे-पाटील, एम. यू. सय्यद, आर. एम. काळुंके, उपसरपंच मीनाताई पाटील, कडदोराच्या सरपंच सुनंदा रणखांब, व्हंताळचे उपसरपंच विजय सगर, भरत रणखांब आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी २५ स्टॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्यांची मांडणी करण्यात आली. यामध्ये प्रभावती बिराजदार, सविता मुगळे, स्वाती तूकशेट्टी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय, तर मालाश्री बगले यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. सूत्रसंचालन किशोर औरादे यांनी केले. महोत्सवाासठी देवीदास पावशेरे, पल्लवी डोणगावे, प्रियंका घंटे, जयश्री बिराजदार, आसावरी पावशेरे, निशा घोटमाळे, बालाजी गुरव, अरविंद दळवे, विठ्ठल दासमे आदींनी परिश्रम घेतले.
150821\4327img-20210815-wa0018.jpg
कलदेव निंबाळा येथिल रानभाजी महोत्सवात पाहणी करताना गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे व मान्यवर.