उस्मानाबाद तालुक्यात अल्पवयीन मुलीवर जबरी अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 06:15 PM2018-10-27T18:15:25+5:302018-10-27T18:16:42+5:30
६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याप्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
ढोकी (उस्मानाबाद ) : १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याप्रकरणी पाच जणांविरुध्द पोस्को कायद्यांतर्गत ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ८ ते २६ आॅक्टोबर या कालावधीत उस्मानाबाद तालुक्यातील कोंड तसेच पुणे जिल्ह्यातील चिखली येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील पांडुरंग हरिदास रकटे याने गावामध्येच शिक्षण घेत असलेल्या एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला ८ आॅक्टोबर रोजी दुपारी चार वाजता पळवून नेऊन चिखली (ता. खेड, जि. पुणे) येथे त्याची बहीण अश्विनी महादेव फेरे यांच्या घरात ठेवले. तेथेच २६ आॅक्टोबरपर्यंत पीडित मुलीवर वारंवार अतिप्रसंग केला. यासाठी मुलीच्या भाऊ आणि वडीलांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद पीडित मुलीने शुक्रवारी रात्री उशिरा ढोकी पोलीस ठाण्यात दिली.
यारून पांडुरंग हरिदास रकटे, मैनाबाई हरिदास रकटे, सोनाली दत्ता भोसले (रा. तावरजखेडा), महादेव फेरे व अश्विनी महादेव फेरे (रा. चिखली, जि. पुणे) यांच्याविरुद्ध पोस्कोसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार बी. बी. सरपाळे हे करत आहेत.