येणेगुरात भरला ‘रयत बाजार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:01 AM2021-03-04T05:01:36+5:302021-03-04T05:01:36+5:30
येणेगूर : तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने वतीने येणेगूर येथे ‘पिकेल ते विकेल’ उपक्रमांतर्गत संत सावतामाळी रयत बाजार भरविण्यात आला. ...
येणेगूर : तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने वतीने येणेगूर येथे ‘पिकेल ते विकेल’ उपक्रमांतर्गत संत सावतामाळी रयत बाजार भरविण्यात आला. शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला व फळे दलालांना न विकता सरळ ग्राहकांना विक्री करण्याच्या या उपक्रमाचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बजाज अलायन्स विमा कंपनीचे उमरगा, लोहारा तालुक्याचे व्यवस्थापक कविश उमाक यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमामुळे दलाल लोकांना मिळणारा नफा कमी होवून शेतकरी व ग्राहक दोघांचाही फायदा होणार आहे. यावेळी विमा कंपनीच्या वतीने भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास मंडळ अधिकारी खंडागळे, निळकंठ लामजने, ज्ञानेश्वर लामजने, महेश हिप्परगे आदीसह अनेक शेतकरी उपस्थित होते.