‘आरटीई’ प्रवेशास पुन्हा मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:34 AM2021-07-27T04:34:14+5:302021-07-27T04:34:14+5:30

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायदयानुसार दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना प्रवेशासाठी शाळांना आर.टी.ई. अंतर्गत लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांच्या ...

Re-extension of RTE admission | ‘आरटीई’ प्रवेशास पुन्हा मुदतवाढ

‘आरटीई’ प्रवेशास पुन्हा मुदतवाढ

googlenewsNext

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायदयानुसार दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना प्रवेशासाठी शाळांना आर.टी.ई. अंतर्गत लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेमध्ये जाऊन आर.टी.ई. पोर्टलवरील दिनांकानुसार मूळ प्रमाणपत्रे आणि छायाकिंत प्रती घेऊन पाल्याचा तात्पुरता प्रवेश घेण्यासाठी ११ जून ते २३ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, बऱ्याच पालकांनी अद्यापही प्रवेश घेतलेले नसल्याने शासनाने पालक आणि गटशिक्षणाधिकारी यांच्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

मुख्याध्यापकांनी संबंधित पालकांना एस.एम.एस. करून मुदतवाढीबाबत कळवावे. तसेच एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची मुख्याध्यापकांनी आणि पालकांनी दक्षता घ्यावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने पालकांना शाळेत जाऊन प्रवेश घेणे शक्य नसल्यास समाजमाध्यम अथवा मेलद्वारे कागदपत्रे शाळेस पाठवून मुख्याध्यापकांशी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधून प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहरे यांनी केले आहे.

Web Title: Re-extension of RTE admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.