पदाधिकाऱ्यांचा सत्कार, बोधचिन्हाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:22 AM2021-07-15T04:22:59+5:302021-07-15T04:22:59+5:30
वाशी : येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि महाविद्यालय सुवर्ण महोत्सवी स्थापना वर्ष बोध चिन्हाचे ...
वाशी : येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि महाविद्यालय सुवर्ण महोत्सवी स्थापना वर्ष बोध चिन्हाचे अनावरण बुधवारी पार पडले.
अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव नंदन जगदाळे, पी. टी. पाटील, माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे, खजिनदार अरुण देबडवार, कार्यकारिणी सदस्य जयकुमार शितोळे, व्ही. एस. पाटील, प्राचार्य डॉ. प्रकाश थोरात, डॉ. व्ही. एम. गुरमे, प्राचार्य डॉ. रवींद्र कठारे उपस्थित होते.
यावेळी बोध चिन्हामधील प्रत्येक घटकांचे माहिती देण्यात आली. या कार्यक्रमामध्ये कनिष्ठ कला विभागाच्या वतीने प्रा.भगवान राऊत व प्रा. हनुमंत काळे यांच्या वतीने मास्क आणि ‘क’ जीवनसत्व गोळ्यांचे वितरण करण्यात आले. प्राचार्य डॉ. रवींद्र कठारे यांनी प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाच्या प्रगतीविषयी आणि सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. एम. डी. उंदरे यांनी केले. महाविद्यालय सुवर्ण महोत्सव कार्यक्रम समितीचे चेअरमन प्रा. डॉ. आनंद करडे यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, छत्रपती शिवाजी विद्यालय व बालसंस्कार विद्यामंदिर यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.