परंडा येथे खेळाडूंचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:22 AM2021-07-15T04:22:49+5:302021-07-15T04:22:49+5:30
परंडा : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचानालय, जिल्हा क्रीडा कार्यालय व परंडा तालुका क्रीडा समिती यांच्या ...
परंडा : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचानालय, जिल्हा क्रीडा कार्यालय व परंडा तालुका क्रीडा समिती यांच्या वतीने येथील तहसील कार्यालयात टोकिओ ऑलंम्पिक स्पर्धेत निवड झालेल्या तालुक्यातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार अनिल कुमार हेळकर, माजी सभापती नवनाथ जगताप, क्रीडाधिकारी कैलास लटके, डॉ. सुभाष मारकड, क्रीडा संयोजक सचिन पाटील, प्रा. दीपक ओव्हाळ, सहसंयोजक महेश शिंदे, पै. सतीश मिस्कीन, पै. आण्णा दुबळे, पै. राहुल वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील राज्य व राष्ट्रीय पातळीवर प्रावीण्य मिळविणाऱ्या गुणवंत खेळाडू पै. नागेश शिंदे, बालाजी बुरूंगे, राहुल वाघमारे, गणेश कारंडे, लक्ष्मण जाधव, दीपक पाटील, अजित मुळीक, उमेश शाहणे या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सचिन पाटील यांनी केले तर आभार दीपक ओव्हाळ यांनी मानले.