महाडीबीटी पाेर्टलवर ६५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:24 AM2021-01-10T04:24:56+5:302021-01-10T04:24:56+5:30
कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण, ट्रॅक्टर, ठिबक आदी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर एकच अर्ज करावा लागणार ...
कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण, ट्रॅक्टर, ठिबक आदी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर एकच अर्ज करावा लागणार होता. त्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत देण्यात आली होती; मात्र निवडणुकांच्या कामात सीएसी केंद्रचालक व्यस्त होते. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांची नोंदणी रखडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांकडून मुदत वाढविण्याची मागणी केली जाऊ लागली होती. ही मागणी लक्षात घेत कृषी आयुक्तांनी ११ जानेवारीपर्यंत नोंदणी करण्यासाठी मुदत वाढविण्यात आली. ७ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील ३७ हजार ६४१ शेतकऱ्यांनी यांत्रिकीरणासाठी तर सिंचनासंदर्भात २७ हजार ५५२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणीची मुदत संपल्यानंतर प्राप्त अर्जांपैकी लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी शेवटचे दोन दिवस शेतकऱ्यांच्या हाती शिल्लक राहिले आहेत.
पॉईंटर...
जिल्ह्यात ४ लाख ९ हजार शेतकरी संख्या असून, ७ जानेवारीपर्यंत ६५ हजार १९३ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे.
नोंदणीसाठी शेतकऱ्यांचा मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.
कोट...
७ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात सिंचनासाठी २७ हजार ६४१ तर यांत्रिकीकरणासाठी ३७ हजार ६४१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. एकाच अर्जाद्वारे शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी अर्ज करावेत.
उमेश घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.