ग्रामीण विकास यंत्रणेला पाच वर्षांनंतर नियमित प्रकल्प संचालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:39 AM2021-09-10T04:39:36+5:302021-09-10T04:39:36+5:30
उस्मानाबाद - जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास तसेच राज्य शासन पुरस्कृत घरकूल योजना राबविल्या जातात. या माध्यमातून ...
उस्मानाबाद - जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास तसेच राज्य शासन पुरस्कृत घरकूल योजना राबविल्या जातात. या माध्यमातून गोरगरीब कुटुंबांना हक्काचा निवारा उपलब्ध करून दिला जातो. एवढे महत्वपूर्ण पद मागील चार पाच वर्षांपासून रिक्त होते. अखेर यशदा पुणे येथील सहायक प्राध्यापक पी. पी. शिंदे यांची या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले यांची पदोन्नतीने नांदेड प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती केली.
जिल्हा परिषदेतील तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले यांच्या जागी सोलापूर जिल्हा परिषदेतील राऊत यांची नियुक्ती केली होती. बदली आदेशानंतर आठ ते दहा दिवसांनी ते रुजू झाले. मात्र डॉ. तुबाकले हे अतिरिक्त मुख्य कार्यकारी म्हणून पदोन्नतीस पात्र असल्याने त्यांना नियुक्ती देण्यात आलेली नव्हती. अखेर शासनाने नांदेड येथे समकक्ष असलेल्या प्रकल्प संचालक या पदावर नियुक्ती आहे. तुबाकले यांनी आपला कार्यकाळ विना तक्रार यशस्वीरीत्या प्रयत्न केला. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात नेहमी त्यांनी समन्वय ठेवला. परिणाम प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असे चित्र अपवादाने ही दिसले नाही. दरम्यान, उस्मानाबाद प्रकल्प संचालक पदासाठी मागील पाच वर्षांपासून कोणीही वाली नव्हते. त्यामुळे हा चार्ज कायम अतिरिक्त उपमुख्य अधिकारी यांच्याकडे राहिला. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्याला पी. पी. शिंदे (सहायक प्राध्यापक यशदा, पुणे) यांच्या रूपाने नियमित प्रकल्प संचालक मिळाले आहेत. नियमित अधिकारी मिळाल्याने कामाला अधिक गती येईल, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.