अणदूरचे खंडोबा मंदिर दर रविवारी बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:56 AM2021-03-13T04:56:49+5:302021-03-13T04:56:49+5:30
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात शासनाने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन करून श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टने याबाबत खबरदारी घेऊन भक्तांना सूचना ...
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात शासनाने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन करून श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टने याबाबत खबरदारी घेऊन भक्तांना सूचना केल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे पुन्हा मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. असे असतानाचा मागील काही दिवसांत कोराेनाचा संसर्ग वाढू लागला आहे. काेराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन श्री खंडोबाचे मंदिर बंद करण्याचे ठरले आहे. भाविकांनी पुढील आदेश येईपर्यंत रविवारी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोना रुग्णाची संख्या वाढल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच दर रविवारी मंदिरे आणि प्रार्थनास्थळे, बाजार बंद राहणार आहेत. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अणदूर येथील श्री खंडोबाचे मंदिर दर रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. अणदूरचे श्री खंडोबा मंदिर जागृत देवस्थान असल्याने दर रविवारी अणदूरला भाविकांची मोठी गर्दी असते. भाविकांनी यापुढे पुढील आदेश येईपर्यंत दर रविवारी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन मंदिर समितीचे सचिव सुनील ढेपे यांनी केले आहे.