लोहारा तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याने नागरिक चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 06:22 PM2023-07-05T18:22:06+5:302023-07-05T18:22:28+5:30
लोहारा तालुक्यातील सास्तुरसह परीसरात अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत.
- बालाजी बिराजदार
लोहारा ( जि.धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील सास्तुर परिसराला बुधवारी दुपारी ४ वाजून ३२ मिनिटाच्या सुमारास १.८ रिस्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोहारा तालुक्यातील सास्तुरसह परीसरात अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. आज दुपारी ४ वाजून ३२ मिनिटाच्या सुमारास लोहारा तालुक्यातील सास्तूर परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. जमीनितून गूढ आवाज आला. यामुळे जमिन हादरली. सास्तूर, एकोंडी (लो) होळी, उदतपूर, सालेगाव, तोरंबा, हराळी, रेबेचिंचोली या परिसरालाही भूकंपाचा धक्का बसल्याची चर्चा नागरिकांत होती. दरम्यान, लातूर येथील भूकंपमापक केंद्रात १.८ रिस्टरस्केलची नोंद झाली असल्याची माहिती वैज्ञानिक सहाय्यक के.जी. परदेशी यांनी दिली. या जाणवलेल्या धक्क्यामुळे सन १९९३ साली झालेल्या प्रलंयकारी भूकंपाची अठवण जागी झाली.