राष्ट्रवादीच्या आवाहनाला प्रतिसाद, ६२ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:26 AM2021-05-03T04:26:28+5:302021-05-03T04:26:28+5:30
पक्ष नेतृत्वांनी केलेल्या आवाहनानंतर कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने कामगार दिनाचे औचित्य साधत सम्राट ग्रुपच्या सहकार्याने शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक ...
पक्ष नेतृत्वांनी केलेल्या आवाहनानंतर कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने कामगार दिनाचे औचित्य साधत सम्राट ग्रुपच्या सहकार्याने शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष श्रीधर भवर, ॲड. प्रवीण यादव, वक्ता विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे, प्रा. डॉ. बाळकृष्ण भवर, डॉ. शक्तीकुमार भवर, डॉ. ऋषीकुमार भवर, किरण मस्के, भाऊ कुचेकर, शंकर टोपे, भिमा हगारे, उमेश मडके, अजय जाधव यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रियदर्शनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप शिंदे, अविनाश घोडके, सुरेश घोगरे, बापू खबाले, सम्राट ग्रुपचे मनोज शिंदे, सौरव मुंडे, आकाश धनावडे, सूरज शिंदे, किसना शिंदे, आशिष चंदनशिव, अण्णा वनकळस, कृष्णा काटे, अशोक जगताप, बालाजी भातलंवडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या शिबिरात एकूण ६२ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीस रक्त सुपुर्द केले आहे.