चव्हाण प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:22 AM2021-07-02T04:22:40+5:302021-07-02T04:22:40+5:30

उस्मानाबाद : शासकीय जिल्हा रुग्णालयातील रक्त संक्रमण विभागात कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे रक्त साठा तुटवडा असल्याने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या उस्मानाबाद केंद्राच्या ...

Response to Chavan Pratishthan's Blood Donation Camp | चव्हाण प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद

चव्हाण प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद

googlenewsNext

उस्मानाबाद : शासकीय जिल्हा रुग्णालयातील रक्त संक्रमण विभागात कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे रक्त साठा तुटवडा असल्याने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या उस्मानाबाद केंद्राच्या वतीने बुधवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. याचे उद्‌घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी केले. यावेळी किरणताई निंबाळकर, अजित शेंडगे, असिफ शेख, सलीम इस्माईल शेख, फरदिन मुजावर, कृष्णा तेरकर, सोमनाथ जगताप, किशोर राऊत, जुलफैखा काझी, अजित घुटे, बाहेद मुजावर, नितीन घुले, अनिकेत ढंगेकर आदी युवक-युवतींनी शिबिरात रक्तदान केले. शिबिरासाठी अध्यक्ष जीवनराव गोरे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. जयसिंगराव देशमुख, सचिव बालाजी तांबे, कोषाध्यक्ष सुरेश टेकाळे. सदस्य प्राचार्य डॉ. रमेश दापके, आदित्य गोरे, डॉ. स्मिता शहापूरकर, सुरेखा जगदाळे, डॉ. तब्बसूम सय्यद, विशेष निमंत्रित सदस्य अरविंद गोरे, धनंजय पाटील, उत्तमराव लोमटे, अ‍ॅड. सुंदरराव हुंबे, बी. बी. ठोंबरे, समन्वयक सदस्य प्रदीप चालुक्य, संतोष हंबीरे, सुरेखा जाधव, भा. न. शेळके, किरण निंबाळकर, रेखा लोमटे, खलील पठाण, रॉबीन बगाडे, जैनुद्दीन शेख, शम्सुल उर्दू शाळेतील शिक्षक आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: Response to Chavan Pratishthan's Blood Donation Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.