‘माझी शिधापत्रिका, माझा हक्क’ शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:36 AM2021-08-28T04:36:05+5:302021-08-28T04:36:05+5:30

याप्रसंगी उमरगा येथील उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, प्रभारी तहसीलदार तथा पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार संभाजी थोटे, मंडळ ...

Response to ‘My ration card, my rights’ camp | ‘माझी शिधापत्रिका, माझा हक्क’ शिबिरास प्रतिसाद

‘माझी शिधापत्रिका, माझा हक्क’ शिबिरास प्रतिसाद

googlenewsNext

याप्रसंगी उमरगा येथील उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, प्रभारी तहसीलदार तथा पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार संभाजी थोटे, मंडळ अधिकारी प्रवीण कोकणे, अव्वल कारकून बनसोडे, तलाठी एन. पी. बेंबळीकर, बालाजी पांचाळ, सरपंच प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण, उपसरपंच धनंजय दळवी, कुमार पवार, चेअरमन किशोर सांगवे, दादा चिंकुद्रे, ग्रामसेवक जाधव यांची प्रमुख उपस्थिती हाेती. याप्रसंगी उपस्थित उपविभागीय अधिकारी उदमले यांनी मार्गदर्शन केले. या माेहिमेत कुटुंबातील सर्वांची नावे शिधापत्रिकेत समाविष्ट करावीत, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी पेठसांगवी, नारंगवाडी, मातोळा, कवठा, लिंबाळा, करदोरा आदी गावचे लाेक उपस्थित हाेते. शिबिरात १७६ अर्ज दाखल झाले हातेे. यापैकी २७ जणांना शिधापत्रिका वितरित केल्या. सूत्रसंचालन विठ्ठल चिंकुद्रे यांनी तर आभार मुक्ताजी जगताप यांनी मानले.

Web Title: Response to ‘My ration card, my rights’ camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.