जेवळी येथे लसीकरणास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:31 AM2021-04-18T04:31:55+5:302021-04-18T04:31:55+5:30
जेवळी : लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी येथे कोविड प्रतिबंधक लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत १०२ नागरिकांना ही लस ...
जेवळी : लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी येथे कोविड प्रतिबंधक लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत १०२ नागरिकांना ही लस टोचण्यात आली आहे. जेवळी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या वडगांव (गां) या गावातील एका व्यक्तीचा लसीकरण केल्यानंतर चार दिवसांनी मृत्यू झाला होता. त्यामुळे या परिसरात लसीकरण करून घेण्यासाठी नागरिक तयार होत नव्हते. परंतु, आशा कार्यकर्त्या वनिता पीचे, जयश्री बिराजदार यांनी या लसीकरण संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करीत येथील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यामुळे येथील लसीकरण केंद्रात १०२ नागरिकांनी लसीकरण करून घेतले. या वेळी सरपंच चंद्रकांत साखरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एन. गावडे, डॉ. अमोल सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य विवेकानंद बिराजदार, सुधीर येणेगुरे, दिलीप चौगुले, आशा कार्यकर्ती वनिता पीचे, जयश्री बिराजदार, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.