निर्बंध शिथिल; नागरिक बिनधास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:37 AM2021-08-13T04:37:14+5:302021-08-13T04:37:14+5:30
परंडा : कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने प्रशासनाने निर्बंध शिथिल केले असले तरी परंड्यात मागील दोन ते तीन दिवसात पुन्हा ...
परंडा : कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने प्रशासनाने निर्बंध शिथिल केले असले तरी परंड्यात मागील दोन ते तीन दिवसात पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. असे असतानाही नागरिक मात्र बेफिकिर राहून रस्त्यावर मोठी गर्दी करीत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. मात्र, परंडा शहरात गुरुवारी विविध भागात नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापाऱ्यांकडून नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असून, व्यवहार सुरळीत व पूर्ववत व्हावेत, असे वाटत असल्यास कोरोना नियमाचे पालन करा, असे आवाहन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वाजीद दखनी यांनी नागरिकांना केले आहे.
चौकट....
भोंगा लावून जनजागृती
कोरोना संसर्ग अद्याप संपला नसून, वाढते कोरोना रुग्ण व तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून संसर्ग होण्यापासून दूर राहावे. तसेच मास्कसह सॅनिटायझरचा वापर सुरूच ठेवावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून भोंगा लावून करण्यात येत आहे.
कारवाई थंडावली
कोरोना संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात काळात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. परंतु, मागील काही महिन्यात ही कारवाई देखील थंडावल्यामुळे शहरात अनेकजण बिनधास्त विनामास्क फिरताना दिसून येत आहेत.
120821\psx_20210812_143349.jpg
फोटो कॅप्शन...
परंडा शहरातील रस्त्यावर झालेली गर्दी व विस्कळीत झालेली वाहतूक दोन फोटो पाठवले आहेत.