ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला, दुसऱ्या लाटेत तब्ब्ल १५४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:35 AM2021-04-23T04:35:38+5:302021-04-23T04:35:38+5:30

चौकट... ऑक्सिजनसाठी करावा लागतोय ६० किमीचा प्रवास वाशी तालुक्यातील रुग्णांना ऑक्सिजनसाठी उस्मानाबाद व बार्शी या ठिकाणी ऑक्सिजन बेडसाठी ६० ...

The risk of corona increased in rural areas, with 154 people killed in the second wave | ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला, दुसऱ्या लाटेत तब्ब्ल १५४ जणांचा मृत्यू

ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला, दुसऱ्या लाटेत तब्ब्ल १५४ जणांचा मृत्यू

googlenewsNext

चौकट...

ऑक्सिजनसाठी करावा लागतोय ६० किमीचा प्रवास

वाशी तालुक्यातील रुग्णांना ऑक्सिजनसाठी उस्मानाबाद व बार्शी या ठिकाणी ऑक्सिजन बेडसाठी ६० किमीचा प्रवास करावा लागत आहे. रुग्णालयात दाखल होण्यासाठी ऑक्सिजन रुग्णवाहिकाही वेळेवर मिळणे कठीण झाले आहे. अशीच स्थिती कळंब तालुक्यातील रुग्णांची आहे.

ओटू बेडचीसाठी धावपळ

ऑक्सिजनचे प्रमाण ९० च्या खाली गेल्यानंतर रुग्णांना धाप लागणे व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागतो. अशा स्थिती रुग्णांना ऑक्सिजन बेडची तातडीने गरज भासते. मात्र, सध्या रुग्णालयात ओटू बेड फुल्ल झाले आहेत. त्यामुळे रुग्णांना ओटू बेडसाठी धावपळ करावी लागत आहे. तर रेमडेसिविर इंजेक्शनचा नियमित तुटवडा निर्माण होऊ लागल्याने रुग्ण नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही चौकशी करीत आहेत.

कोट...

पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग अधिक आहे. पहिल्या लाटेत ३.४ टक्के इतका मृत्यू दर होता. तर सध्या ०.९ टक्के इतका मृत्यूदर आहे. रुग्णांना ओटू बेड मिळावेत यासाठी ४४ प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रत्येकी १० ऑक्सिजन बेडची मान्यता देण्यात आली आहे.

डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी

तालुका एकूण रूग्ण सर्वाधिक रूग्ण असलेले गाव व रुग्णसंख्या कोरोनाबाधित गावे कोरोनामुक्त गावे

उस्मानाबाद १५०८ तेर ५८ ११८ १०

तुळजापूर १२११ अणदूर ९० रुग्ण १३५ १६

कळंब १२८४ घारगाव ५० रुग्ण ८४ १०

वाशी २६१ इसरुप २७ रुग्ण ५२ २

भूम -- --- --- --

परंडा --- --- --- ---

उमरगा ३३०६ मुळज ३२ १०३ ११

लोहारा --- --- -- --

मृत्यूचे तांडव

तालुका मृत्यू

उस्मानाबाद ५४

तुळजापूर २२

कळंब ९

वाशी ४

भूम --

परंडा --

उमरगा ५०

लोहारा --

ऑक्सीजन बेड्‌सची मारामार

तालुका कोविड हॉस्पीटल्स साधे बेड्‌स ऑक्सीजन बेड्‌स

उस्मानाबाद १२ ३७६ ४१२

तुळजापूर २ ०६ १०४

कळंब ३ ४५ २८

वाशी ३ २६१ ७

भूम १ ०० १५

परंडा २ २४ ४०

उमरगा ९ १५३ ११०

लोहारा ० ०० ००

Web Title: The risk of corona increased in rural areas, with 154 people killed in the second wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.