नदी-नाले दुथडी, काेल्हापुरी बंधारा गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:39 AM2021-09-07T04:39:39+5:302021-09-07T04:39:39+5:30
दोन-तीन दिवसांपासून भूमसह परिसरात पावसाचा जाेर कायम आहे. सततच्या पावसामुळे बाणगंगा मध्यम प्रकल्प ओहर फ्लो झाला आहे. त्यामुळे सांडव्याद्वारे ...
दोन-तीन दिवसांपासून भूमसह परिसरात पावसाचा जाेर कायम आहे. सततच्या पावसामुळे बाणगंगा मध्यम प्रकल्प ओहर फ्लो झाला आहे. त्यामुळे सांडव्याद्वारे पाण्याचा माेठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. असे असतानाच पुन्हा राेसंबा शिवारात जाेरदार पाऊस झाला. त्यामुळे पाण्याचा जाेर वाढून बाणगंगा नदीवरील काेल्हापुरी बंधारा फुटला. नदीचा प्रवाह बदलल्याने गट क्र. ८ मधील लक्ष्मण मारुती ढगे (रा. चिंचपूर ढगे) यांच्या शेतात पुराचे पाणी घुसले. त्यामुळे अर्धा एकरावरील उडीद वाहून गेला. आरसाेली नदीवरील पूलही पाण्याखाली गेला हाेता. त्यामुळे भूम-बार्शी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली हाेती.
घरांची झाली पडझड...
भूम तालुक्यातील वंजारवाडी येथील आप्पा सोपान काळे, आबा तुळशीराम रुपनर, ललिता मारकड, हाडोंग्री येथील सुनील बाबुराव तळेकर, अर्जुन गोरख टेकाळे,कोंडाबाई टेकाळे यांच्या घरांची पडझड झाली आहे. साेबतच भूम शहरातील नीलावती किसन शेंडगे, महंमद रहिमखाॅ जिराईत, शिवाजी नामदेव कदम, आशा तुकाराम कदम यांच्याही घराच्या भिंती ढासळल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले.