रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:32 AM2021-04-01T04:32:53+5:302021-04-01T04:32:53+5:30
‘जनावरांना आवरा’ कळंब : शहरात दिवसेंदिवस मोकाट जनावरांचा त्रास वाढत चालला आहे. रहदारीच्या मार्गावर ही जनावरे ठिय्या मांडत असल्यामुळे ...
‘जनावरांना आवरा’
कळंब : शहरात दिवसेंदिवस मोकाट जनावरांचा त्रास वाढत चालला आहे. रहदारीच्या मार्गावर ही जनावरे ठिय्या मांडत असल्यामुळे यातून अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
नियमांकडे दुर्लक्ष
परंडा : मागील दोन महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. परंतु नागरिकांकडून मात्र नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे.
अंधाराचे साम्राज्य
उस्मानाबाद : शहरातील समर्थनगर भागातील काही पथदिवे बंद आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी या भागात अंधाराचे साम्राज्य पसरत असून, रहिवाशांची गैरसोय होत आहे. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
अवैध धंदे वाढले
लोहारा : तालुक्याच्या ग्रामीण भागात अवैध दारू विक्री यासह मटका, जुगार यासारखे धंदे खुलेआम सुरू आहेत. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून, पोलिसांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.