गणेशोत्सवानिमित्त भूममध्ये पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:33 AM2021-09-11T04:33:14+5:302021-09-11T04:33:14+5:30

भूम : शहरात आज विविध बाल गणेश मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना केली. तसेच ‘एक पोलीस ठाणे एक गणपती’ या ...

Road movement in the land on the occasion of Ganeshotsav | गणेशोत्सवानिमित्त भूममध्ये पथसंचलन

गणेशोत्सवानिमित्त भूममध्ये पथसंचलन

googlenewsNext

भूम : शहरात आज विविध बाल गणेश मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना केली. तसेच ‘एक पोलीस ठाणे एक गणपती’ या अंतर्गत येथील पोलिस ठाण्यातही गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान, या उत्सवानिमित्त पोलिस प्रशासनाच्या वतीने शहरातून पथसंचलन करण्यात आले.

गणेश उत्सवानिमित्त विविध सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ गजबजून गेली होती. तेवढ्याच उत्साहाने नागरिकांनी देखील गणरायाचे मोठ्या थाटात स्वागत केले. बाजारपेठेत विविध ठिकाणी बाप्पांची आकर्षक मूर्ती घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. मूर्तीसोबतच खव्याचे पेढे व मोदक खरेदीसाठी देखील नागरिकांनी शहरातील हॉटेलमध्ये गर्दी केली होती. दुपारी १ ते २ दरम्यान गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी चांगला मुहूर्त असल्याचे जाणकार मंडळींकडून सांगण्यात आले.

दरम्यान, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले. शहरातील प्रमुख चौकातून पोलीस ठाणे येथे आल्यानंतर हे संचलन समाप्त करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक दत्तात्रय सुरवसे,सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश साळवी, पोलिस उपनिरीक्षक जगताप यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Road movement in the land on the occasion of Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.