ड्रेनेजपाठाेपाठ रस्ते, नाल्यांची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:36 AM2021-09-05T04:36:48+5:302021-09-05T04:36:48+5:30

स्ट्रेंचलेस तंत्रज्ञानाचा अवलंब राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्व भागात दुसऱ्या टप्प्यात ड्रेनेज लाइन टाकली जाणार आहे. परंतु, ताेवर त्या भागातील सांडपाणी ...

Roads and nallas along drainage | ड्रेनेजपाठाेपाठ रस्ते, नाल्यांची कामे

ड्रेनेजपाठाेपाठ रस्ते, नाल्यांची कामे

googlenewsNext

स्ट्रेंचलेस तंत्रज्ञानाचा अवलंब

राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्व भागात दुसऱ्या टप्प्यात ड्रेनेज लाइन टाकली जाणार आहे. परंतु, ताेवर त्या भागातील सांडपाणी उघड्यावर साठू नये, यासाठी स्ट्रेंचलेस (भाेगदा) तंत्रज्ञानाचा अवलंब करून हे पाणी नाझा हाॅटेलपर्यंत आणून ड्रेनेज लाइनमध्ये साेडले जाणार आहे.

सहा महिन्यांत २०८ काेटी...

महत्त्वाची पदे सेनेकडे असताना शहराला निधी मिळत नाही, अशी ओरड विराेधक करीत आहेत. मात्र, त्यांना सांगू इच्छिताे, राज्याचे मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांच्या रूपाने सेनेकडे आहे. पालकमंत्री शंकरराव गडाख सेनेचे आहेत. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर सेनेचे आहेत. आमदार कैलास पाटील सेनेचे आहेत; आणि नगराध्यक्षपदी मी स्वत: सेनेचाच आहे. त्यामुळे अवघ्या सहा महिन्यांत शहराला तब्बल २०८ काेटी रुपये एवढा निधी मिळाला आहे. येत्या काही दिवसांत आणखी निधी येणार आहे. परंतु, जे प्रत्यक्ष मिळाले, त्याबाबतच बाेलण्याची माझी सवय आहे, अशा शब्दांत नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी विराेधकांना टाेला लगावला.

भाेगावतीचे भाेग सरतील...

शहरातून वाहणाऱ्या भाेगावती नदीपात्राचे सुशाेभीकरण करावे, अशी सातत्याने मागणी हाेत हाेती. परंतु, जाेपर्यंत ड्रेनेज लाइन टाकून हाेणार नाही, ताेपर्यंत त्याचा उपयाेग नव्हता. कारण दाेन्ही लाइन याच नदीपात्राच्या बाजूने जाणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मात्र, भाेगावतीचे भाेग सरतील. घाट बांधण्याचा जवळपास २५ ते ५० काेटींचा प्रस्ताव सादर केल्याचेही नगराध्यक्ष राजेनिंबाळकर म्हणाले.

Web Title: Roads and nallas along drainage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.