धाराशिवमध्ये ज्योती क्रांती मल्टीस्टेट बॅंकेवर दराेडा; पिस्तुल, चाकूचा धाक दाखवून लाखोंचे दागिने, रोकड लुटली
By बाबुराव चव्हाण | Published: December 23, 2023 09:03 PM2023-12-23T21:03:54+5:302023-12-23T21:06:41+5:30
माहिती मिळताच पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चाैघेजण कैद झाले आहेत.
धाराशिव : शहराच्या मध्यवर्ती भागातील ज्याेती क्रांती मल्टीस्टेट बॅंक शनिवारी सायंकाळच्या सुमारास शसस्त्र दराेडेखाेरांनी पिस्टल, चाकूचा धाक दाखवून लूटली. बॅंक कर्मचाऱ्यांना डांबून लाखाेंचे दागिने तसेच राेकड लंपास केली. माहिती मिळताच पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चाैघेजण कैद झाले आहेत.
धाराशिव शहरातील श्री तुळजाभवानी क्रिडा संकुलाजवळच ज्याेती क्रांती काे-ऑपरेटिव्ह क्रेडिट साेसायटी लि. ही बॅंक आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास या बॅंकेतील कर्मचारी काम करीत असतानाच अज्ञात पाच व्यक्ती बॅंकेत घुसले. त्यांनी आपल्याकडील पिस्टल तसेच चाकूचा धाक दाखवित कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले. यानंतर काही क्षणातच आतील लाखाेंचे साेने तसेच राेकड घेऊन पसार झाले. यापैकी चाैघे दराेडेखाेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
धाराशिवमध्ये ज्योती क्रांती मल्टीस्टेट बॅंकेवर दराेडा, कर्मचाऱ्यांना डांबले; पिस्तुल, चाकूचा धाक दाखवून लाखोंचे दागिने, रोकड लुटली#Robbery#Police#bankpic.twitter.com/HoCW0Zm2A7
— Lokmat (@lokmat) December 23, 2023
माहती मिळताच अपर पाेलीस अधीक्षक गाेहर हसन, उपविभागीय पाेलीस अधिकारी स्वप्निल राठाेड, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेनि. वासुदेव माेरे, आनंदनगर ठाण्याचे पाेनि बांगर घटनास्थळी दाखल झाले. यानंतर डाॅग स्काॅड तसेच ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी पाेहाेचत तपास सुरू केला आहे.