रस्त्यावरील सळया पडल्या उघड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:28 AM2020-12-24T04:28:13+5:302020-12-24T04:28:13+5:30
तेर : तालुक्यातील तेर येथील सावता माळी ते निळा झेंडा या चौकापर्यतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, काही ठिकाणी सिमेंट ...
तेर : तालुक्यातील तेर येथील सावता माळी ते निळा झेंडा या चौकापर्यतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, काही ठिकाणी सिमेंट रस्ता बनविताना वापरलेले लोखंडी रॉड (गंज) उघडले पडल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील तेर येथील संत सावता माळी मंदिर ते निळा झेंडा चाैकापर्यतचा सिमेंट रस्ता काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. परंतु, सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यासाठी वापरलेले गज उघडे पडले असून, त्यामुळे जिवीतहानी होऊ शकते. त्यामुळे ग्रामपंचायतीने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने कार्यवाही करावी, अशीमागणी होत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. त्यातच रात्री या रस्त्यावर अंधार असतो. रस्त्यावर गज उघडे पडल्यामुळे मोटारसायकलच्या टायरमध्ये गज घुसत असल्याचे काही वाहनचालकांनी सांगितले.