कोरोना प्रतिबंधात आरोग्य केंद्राची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:28 AM2021-03-14T04:28:24+5:302021-03-14T04:28:24+5:30

उमरगा व तुळजापूर तालुका दौऱ्यावर असताना शाळा, अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, पशुवैद्यकीय दवाखाने आणि पंचायत समिती कार्यालयास भेटी देऊन ...

The role of health center in corona prevention is important | कोरोना प्रतिबंधात आरोग्य केंद्राची भूमिका महत्त्वाची

कोरोना प्रतिबंधात आरोग्य केंद्राची भूमिका महत्त्वाची

googlenewsNext

उमरगा व तुळजापूर तालुका दौऱ्यावर असताना शाळा, अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, पशुवैद्यकीय दवाखाने आणि पंचायत समिती कार्यालयास भेटी देऊन तेथील कामाची पाहणी करीत असताना फड यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांनाही भेटी दिल्या. आरोग्य केंद्रात कोरोनाच्या अनुषंगाने घेतल्या जात असलेल्या रुग्णांच्या चाचण्यांची आणि कोरोनाच्या लसीकरणाची पाहणी त्यांनी या दौऱ्यात केली. रुग्णांशी संवाद साधून आरोग्य केंद्रातून त्यांना मिळणाऱ्या सेवांबाबत, कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबाबत विचारपूस केली. यावेळी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांनी दिलेल्या उत्तरांमुळे डॉ. फड यांचे समाधान झाल्याने त्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.

कोरोना प्रतिबंधाबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून केले जात असलेले मार्गदर्शन तसेच कोरोना संशयित रुग्णांचे घेतले जात असलेले नमुने आणि कोरोना प्रतिबंधासाठी दिले जात असलेल्या लस कामातील प्रगतीही कोरोना प्रतिबंधासाठी महत्त्वाची असल्याने त्यांनी यावेळी सांगितले. कोरोना साथीच्या प्रतिबंधाच्या कामांत उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने या सर्व कर्मचाऱ्यांच्या कामांचे डॉ. फड यांनी कौतुक केले. आरोग्य केंद्रातील अंतर्गत स्वच्छता, औषधी आणि साहित्याची उपलब्धता, रुग्णांना दिले जात असलेल्या सोयी सुविधांची त्यांनी पाहणी तर केलीच त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राचा बाह्य परिसराचीही डॉ. फड यांनी पाहिला. आंतरबाह्य स्वच्छतेबरोबरच वृक्ष लागवडीवरही भर देण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. यावेळी डॉ. फड यांच्यासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नितीन दाताळ, समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, गट विकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, डॉ.अमित कदम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास साळुंके, डॉ. सुभाष पवार, डॉ.आकांक्षा गोरे, डॉ. विष्णू सातपुते, समाधान जोगदंड, मेघराज पवार आदी उपस्थित होते.

Web Title: The role of health center in corona prevention is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.