श्री विठ्ठलसाई कारखान्याचे रोलर पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:36 AM2021-08-12T04:36:57+5:302021-08-12T04:36:57+5:30

येत्या हंगामात कारखान्याचे ५ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून, सदर हंगामासाठी लागणाऱ्या तोडणी, वाहतूक यंत्रणेची भरती करण्यात ...

Roller worship of Shri Vitthalsai factory | श्री विठ्ठलसाई कारखान्याचे रोलर पूजन

श्री विठ्ठलसाई कारखान्याचे रोलर पूजन

googlenewsNext

येत्या हंगामात कारखान्याचे ५ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून, सदर हंगामासाठी लागणाऱ्या तोडणी, वाहतूक यंत्रणेची भरती करण्यात आली आहे. तसेच मशिनरी ओव्हरऑईलिंग, दुरुस्तीची कामे युध्द पातळीवर चालू आहेत, अशी माहिती चेअरमन बसवराज पाटील यांनी यावेळी दिली. कार्यक्रमास जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील, जि. प. तील विरोधी पक्षनेते शरण पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन सादिकमियाँ काझी, उमरगा जनता बँकेचे चेअरमन रामकृष्णपंत खरोसेकर, कारखान्याचे संचालक शरणप्पा पत्रिके, केशव पवार, विठ्ठलराव बदोले, विठ्ठलराव पाटील, शिवलिंग माळी, माणिक राठोड, राजू हेबळे, सुभाष पाटील व संचालक तसेच उमरगा पं. स. सभापती सचिन पाटील, जि. प. चे माजी सदस्य गुंडाप्पा भुजबळ, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. अथणी, चिफ इंजिनियर ए. एल. अष्टेकर, चिफ केमिस्ट एस. बी. गायकवाड, मुख्य शेतकी अधिकारी ए. बी. राखेलकर, कार्यालय अधिक्षक के. एम. चौगुले, सर्व अधिकारी, कामगार, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Roller worship of Shri Vitthalsai factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.