पासबुक वाटपात ३३ लाखांचा गैरव्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 03:46 AM2018-10-22T03:46:31+5:302018-10-22T03:46:36+5:30
रोखे घोटाळा, तसेच विनातारण कर्जवाटपामुळे जिल्हा बँक आर्थिक संकटात सापडली आहे़
उस्मानाबाद : रोखे घोटाळा, तसेच विनातारण कर्जवाटपामुळे जिल्हा बँक आर्थिक संकटात सापडली आहे़ त्यात आता दोन वर्षांतील पासबुक गैरव्यवहार उघडकीस आला आहे़ बँक प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेत शाखाधिकाऱ्यांच्या पगारातून ३३ लाख रुपये वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे़ कर्मचाºयांनी या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली आहे़
खातेदाराला पासबुक देताना घेतलेले १०० रुपये शाखेत जमा न केल्याच्या तक्रारी काही दिवसांपूर्वी संचालकांकडून करण्यात आल्या. त्याची गंभीर दखल घेत प्रशासनाने चौकशीसाठी तालुकानिहाय पथके गठीत केली़ शाखांमधील पासबुक स्टॉक, वितरण आणि पासबुकच्या जमा पैशांची तपासणी करण्यात आली़ या चौकशीत मागील दोन वर्षांत पासबूकची तब्बल ३३ लाखाहून अधिक रक्कम बँकेत जमा न झाल्याचे समोर आले़