ग्रामीण रुग्णालयातून थेट केंद्रेकरांना फाेन...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:53 AM2021-05-05T04:53:44+5:302021-05-05T04:53:44+5:30
लोहारा : उमरग्यासाेबतच लाेहारा शहरासह ग्रामीण भागातही काेराेनाचा कहर सुरूच आहे. अशातच ग्रामीण रुग्णालयात यंत्रसामुग्रीची चणचण आहे. त्यामुळे बहुतांशवेळा ...
लोहारा : उमरग्यासाेबतच लाेहारा शहरासह ग्रामीण भागातही काेराेनाचा कहर सुरूच आहे. अशातच ग्रामीण रुग्णालयात यंत्रसामुग्रीची चणचण आहे. त्यामुळे बहुतांशवेळा रुग्ण रेफर करावे लागतात. ही बाब समाेर आल्यानंतर मंगळवारी आमदार सतीश चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालय गाठून आढावा घेतला. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड उपलब्ध हाेत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी थेट विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना फाेन लावला. असुविधा त्यांच्या कानावर घातल्या. त्यांनीही याबाबतीत तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
लाेहारा शहरासाेबतच ग्रामीण भागातही काेराेनाचे रुग्ण माेठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. काेराेनाचा हा संसर्ग राेखण्यासाठी प्रशासनाकडून कठाेर निर्बंध लादले असले तरी संसर्ग सुरूच आहे. अशा अडचणीच्या काळातही येथील ग्रामीण रुग्णालयात आवश्यक साेयीसुविधा नाहीत. अत्यवस्थ रुग्णांना वेळेवर व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन बेड मिळत नाहीत. त्यामुळे रुग्ण उस्मानाबाद, लातूर, तुळजापूर अशा ठिकाणी जाऊन उपचार घेत आहेत. ज्यांची आर्थिक ऐपत नाही, त्यांची मात्र प्रचंड हेळसांड हाेत आहे. ही बाब कळल्यानंतर आमदार सतीश चव्हाण यांनी मंगळवारी अचानक ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित डाॅक्टरांकडून आढावा घेतला असता, परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी थेट विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना फाेन केला. त्यांनी येथील सर्व परिस्थिती त्यांच्या कानावर घातली. याबाबतीत तातडीने काही तर मार्ग निघणे गरजेचे असल्याचे आमदार चव्हाण यांनी म्हटले. त्यावर विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी तातडीने तेथील अधिकाऱ्यांशी बाेलून प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही दिली. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोविंद साठे यांना सदरील यंत्रसामुग्रीचा प्रस्ताव तातडीने जिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्याच्या सूचना आमदार चव्हाण यांनी केल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, तहसीलदार संतोष रुईकर, सतीश इंगळे, डॉ. काळे आदींची उपस्थिती होती.
चाैकट..
यापूर्वीही अनेक पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तातडीने उपायाेजना करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. परंतु, आजही साेयी-सुविधा जैसे थे आहेत. मंगळवारी आमदार चव्हाण यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी थेट विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्याशी बाेलून परिस्थिती त्यांच्यासमाेर मांडली. त्यामुळे आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रयत्नाला कितपत यश येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.