म्हणे, गृहमंत्र्यांना हप्ता द्यावा लागतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:24 AM2021-04-29T04:24:12+5:302021-04-29T04:24:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उस्मानाबाद : ‘एक लाख रुपये हप्ता दे, आम्हाला गृहमंत्र्यांना द्यावा लागतो’, असे सांगून धमकावल्याचा आरोप बुधवारी ...

That said, the Home Minister has to pay the installment | म्हणे, गृहमंत्र्यांना हप्ता द्यावा लागतो

म्हणे, गृहमंत्र्यांना हप्ता द्यावा लागतो

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

उस्मानाबाद : ‘एक लाख रुपये हप्ता दे, आम्हाला गृहमंत्र्यांना द्यावा लागतो’, असे सांगून धमकावल्याचा आरोप बुधवारी पाथरूड येथील एका मद्य विक्रेत्याने केला आहे. दरम्यान, या विक्रेत्यावर कारवाई केल्याने त्याच्याकडून असा आरोप केला जात असल्याचे सांगत पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला.

भूम तालुक्यातील पाथरूड येथे प्रशांत बोराडे यांनी बुधवारी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. त्यांच्या आजोबाच्या नावे पाथरूड येथे देशी दारू विक्रीचे दुकान आहे. भूम ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी २४ एप्रिल रोजी याठिकाणी जात प्रशांत बोराडे यांच्याकडे १ लाख रुपयांची मागणी करत हे पैसे गृहमंत्र्यांना द्यावे लागतात, असे सांगितले. पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप करत खनाळ यांच्याकडून जीविताला धोका असल्याची तक्रारही बोराडे यांनी या निवेदनातून केली आहे. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावरील हे आरोप खोडून काढले आहेत.

कारवाई केल्यामुळे सूडबुद्धीने तक्रार...

संबंधित तक्रारदार हा बंद काळातही चोरून दारू विक्री करत होता. याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. नियमाचा भंग केल्याने दुकान सील करून, परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळेच आपल्यावर सूडबुद्धीने आरोप केले आहेत.

- रामेश्वर खनाळ, पोलीस निरीक्षक, भूम

Web Title: That said, the Home Minister has to pay the installment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.