संगमेश्वर प्रकल्प अखेर ‘ओव्हरफ्लाे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:39 AM2021-09-07T04:39:37+5:302021-09-07T04:39:37+5:30

ईट - मागील आठ ते दहा दिवसांत संगमेश्वर प्रकल्प क्षेत्रात झालेल्या जाेरदार पावसामुळे रविवारी मध्यरात्री संगमेश्वर प्रकल्प ओव्हरफ्लाे झाला. ...

Sangameshwar project finally overflows | संगमेश्वर प्रकल्प अखेर ‘ओव्हरफ्लाे’

संगमेश्वर प्रकल्प अखेर ‘ओव्हरफ्लाे’

googlenewsNext

ईट - मागील आठ ते दहा दिवसांत संगमेश्वर प्रकल्प क्षेत्रात झालेल्या जाेरदार पावसामुळे रविवारी मध्यरात्री संगमेश्वर प्रकल्प ओव्हरफ्लाे झाला. या प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा नदीपात्रात माेठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.

संगमेश्वर मध्यम प्रकल्पामुळे मांजरा नदीकाठच्या दहा ते पंधरा किलोमीटर अंतरात जो जमिनीचा सुपीक भाग येतो तो ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या भागातील अधिकतर शेतकरी ऊस लागवडीवर भर देतात. मागील दाेन वर्ष हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला हाेता; परंतु यंदा पावसाळ्यातील तीन महिने उलटूनही प्रकल्प भरेल असला एकही पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी चिंतेत हाेते. दरम्यान, मागील आठ ते दहा दिवसांत प्रकल्प क्षेत्रात माेठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जलसाठा झपाट्याने वाढत गेला. रविवारी मध्यरात्री हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लाे झाला. प्रकल्पाच्या सांडव्याद्वारे माेठ्या प्रमाणात नदीपात्र पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पाणीप्रश्न लागणार मार्गी...

संगमेश्वर मध्यम प्रकल्पावरून अहमदनगर जिल्ह्यातील जातेगाव, दिघोळ, माळ्याची माळवाडी, उस्मानाबाद जिल्ह्यातील गिरवली, डोकेवाडी, पांढरेवाडी, ईट, नागेवाडी, जोतिबाचीवाडी, माळेवाडी, आंदरुड, तर बीड जिल्ह्यातील लोणी घाट, बोडकेवाडी, वाढवणा, पिंपळगाव, मानेवाडी, चौसाळा अशा सतरा गावच्या पाणीपुरवठा याेजना राबविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या गावचा पाणीप्रश्न वर्षभरासाठी निकाली निघाला आहे.

मागील वर्षी ईट मंडळात १ जून ते सप्टेंबरअखेरपर्यंत ४७७ मिलीमीटर म्हणजेच ८२.२० टक्के इतका पाऊस झाला होत, तर यंदा १ जून ते ६ सप्टेंबर या कालावधीत ६५८ मिलीमीटर म्हणजेच १५४ टक्के पाऊस झाला. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट पाऊस पडला आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील उडीद, मूग, तसेच कांदा पिके वाया गेली, तर साेयाबीनलाही पाणी लागल्याने पिवळे पडले आहे.

Web Title: Sangameshwar project finally overflows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.