Video:'शरद पवार हेच अध्यक्षपदी राहावेत'; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा झाडावर बसून सत्याग्रह

By बाबुराव चव्हाण | Published: May 4, 2023 07:24 PM2023-05-04T19:24:51+5:302023-05-04T19:28:07+5:30

एवढामाेठा निर्णय घेताना त्यांनी राज्यभरातील त्यांच्यावर प्रेम करणारे लाेकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवे हाेते.

Satyagraha by a NCP activist sitting on a tamarind tree in Lohara; Sharad Pawar should remain as President | Video:'शरद पवार हेच अध्यक्षपदी राहावेत'; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा झाडावर बसून सत्याग्रह

Video:'शरद पवार हेच अध्यक्षपदी राहावेत'; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा झाडावर बसून सत्याग्रह

googlenewsNext

लोहारा (जि. धाराशिव) : राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार हेच राहावेत, यासाठी लाेहारा तालुक्यातील आरणी येथील एका पवारप्रेमी शेतकर्याने चिंचेच्या झाडावर बसून गुरूवारी दुपारपासून सत्याग्रह आंदाेलन सुरू केले आहे.

लोहारा तालुक्यातील शेतकरी बळवंत थिटे हे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी आहेत. ते पवारप्रेमी म्हणून परिसरात ओळखले जातात. पवार हेच राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी राहावेत, यासाठी त्यांनी रुवारी दुपारी बारा वाजता आपल्या शेतातील चिंचेच्या झाडावर चढून सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. 

शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा केवळ कुटुंबातील व्यक्तींना सांगून दिला. एवढामाेठा निर्णय घेताना त्यांनी राज्यभरातील त्यांच्यावर प्रेम करणारे लाेकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवे हाेते. यानंतरही पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहावेत, अशी त्यांची मागणी आहे. शुक्रवारी राष्ट्रवादीची बैठक आहे. या बैठकीत काय हाेते, हे बघूनच झाडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Satyagraha by a NCP activist sitting on a tamarind tree in Lohara; Sharad Pawar should remain as President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.