सावंतांनी कोविड सेंटर सुरू करून शासनाचा ताण कमी केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:34 AM2021-05-09T04:34:23+5:302021-05-09T04:34:23+5:30

उस्मानाबाद : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांवर मोठा भार पडत आहे. ...

Sawant eased the government's stress by starting the Kovid Center | सावंतांनी कोविड सेंटर सुरू करून शासनाचा ताण कमी केला

सावंतांनी कोविड सेंटर सुरू करून शासनाचा ताण कमी केला

googlenewsNext

उस्मानाबाद : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांवर मोठा भार पडत आहे. परंतु, आमदार प्रा. तानाजी सावंत यांनी शासनाची कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता स्वखर्चातून बार्शी येथे एक हजार बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करून ग्रामीण भागाच्या दृष्टीने या सेंटरच्या माध्यमातून अतिशय चांगली व्यवस्था निर्माण केली आहे. तसेच शासन व आरोग्य यंत्रणेचा वाढणारा ताण कमी करण्यासाठी शासनाला एकप्रकारे मदत केल्याचे प्रतिपादन राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक उपक्रम बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

बार्शी येथील जेएसपीएम ग्रुप संचलित भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयात १००० खाटांचे जम्बो कोविड केअर सेंटरचे नगरविकास तथा सार्वजनिक उपक्रम बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ७ मे रोजी उद्घाटन करण्यात झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे सचिव तथा मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. प्रा. तानाजीराव सावंत, आ. राजेंद्र राऊत, आ. ज्ञानराज चौगुले, माजी मंत्री दिलीप सोपल, प्रा. शिवाजीराव सावंत, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शामलताई वडणे, बार्शीचे नगराध्यक्ष ॲड. असिफ तांबोळी, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, राजेंद्र मिरगणे, नगरपरिषदेचे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष सूरज साळुंके, गौतम लटके, प्रशांत चेडे, भूम नगरपरिषदेचे संजय गाढवे, बार्शीचे तहसीलदार सुरेश शेरखाने, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, डॉ. दिग्गज दापके, रामचंद्र घोगरे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

मंत्री शिंदे म्हणाले की, बार्शी या ठिकाणी शिवसेनेचे आमदार तानाजीराव सावंत यांनी सोलापूर व उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची सोय करण्यासाठी बार्शी येथे एक हजार बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केल्यामुळे रुग्णांना उपचार घेण्यासाठी बेड मिळत नाहीत अशा तक्रारी यामुळे कमी होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. तसेच ‌या कोविड केअर सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची टीम असून, महिला रुग्णांसाठीदेखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील फारमोठी अडचण दूर झाली असल्याचे ते म्हणाले. यावेळी इतर मान्यवरांनीही आपले मनाेगत व्यक्त केले.

चौकट

पुरुष व महिला रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था

कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी येणाऱ्या पुरुष व महिला रुग्णांची स्वतंत्र सोय केली असून, महिला रुग्णांसाठी १५० व पुरुष रुग्णांसाठी ८५० बेड्स उपलब्ध करून दिले आहेत. विशेष म्हणजे स्वतंत्र एका रूममध्ये तीन रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांना पिण्याचे शुद्ध पाणी, म्युझिक थेरपी, स्नानासाठी गरम पाणी, योग प्राणायाम आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

चौकट

तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी कार्यरत

या कोविड केअर सेंटरमध्ये १८ तज्ज्ञ डॉक्टर्स, ४२ नर्सेस व ८० स्वच्छता कर्मचारी २४ तास कार्यरत आहेत. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांस भेटण्यासाठी आलेल्या नातेवाइकांना ठरावीक वेळ निश्चित करण्यात आली असून, शारीरिक सुरक्षित अंतराबरोबरच त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात येणार आहे. तसेच ऑक्सिजनयुक्त दोन ॲम्बुलन्स उपलब्ध आहेत. रुग्णांना पौष्टिक व सकस नास्ता, दाेन वेळचे जेवण, दोन वेळी चहा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

चौकट

आ.प्रा. सावंत आले रुग्णांच्या मदतीला धावून

आ. प्रा. तानाजीराव सावंत यांचे‌ राजकारणाव्यतिरिक्त सामाजिक कार्य खूप मोठे असून, त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्याची दुष्काळी ओळख पुसून टाकण्यासाठी बाळासाहेब ठाकरे शिव जलक्रांती योजना राबवून पाणी अडवा व पाणी जिरवा हे प्रत्यक्ष कृतीद्वारे काम केल्यामुळे अनेक ठिकाणच्या ओसाड शेतीचे नंदनवन झाले आहे, तर उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयास पाच ऑक्सिजन ड्युरा सिलिंडर उपलब्ध करून देऊन रुग्णांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. बार्शी येथे एक हजार खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करून रुग्णांना खरोखरच आरोग्यदायी दिलासा दिला आहे.

Web Title: Sawant eased the government's stress by starting the Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.