‘मैं हूँ ना’ म्हणत सावंतांकडून रुग्णांसह नातेवाईकांना धीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:32 AM2021-05-14T04:32:39+5:302021-05-14T04:32:39+5:30
परंडा : दिवसागणिक काेराेनाबाधितांच्या संख्येत भर पडत आहेत. काेराेनाग्रस्तांना आधार देण्यासाठी भूम-परंडा-वाशीचे आमदार प्रा. तानाजी सावंत सरसावले आहेत. ‘औषधे ...
परंडा : दिवसागणिक काेराेनाबाधितांच्या संख्येत भर पडत आहेत. काेराेनाग्रस्तांना आधार देण्यासाठी भूम-परंडा-वाशीचे आमदार प्रा. तानाजी सावंत सरसावले आहेत. ‘औषधे आणि टेस्टिंग’साठी जनतेचा एकही रुपया खर्च झाला नाही पाहिजे. त्यासाठी मी खंबीर आहे’, अशा शब्दांत रुग्णांसह नातेवाईकांना धीर देत काेराेनावरील औषधे उपजिल्हा रुग्णालयाकडे सुपूर्द केली.
काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययाेजना केल्या जात आहेत, असे असतानाही काेराेनाबाधितांची संख्या म्हणावी तेवढी कमी हाेताना दिसत नाही तर दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही काही केल्या कमी हाेत नाही. काेराेनामुळे भयभीत झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी भूम-परंडा-वाशीचे आमदार प्रा. तानाजी सावंत सरसावले आहेत. बार्शी येथे एक हजार बेडचे काेविड केअर सेंटर सुरू केल्यानंतर त्यांनी परंडा, वाशी, उस्मानाबाद, भूम येथील शासकीय रुग्णालयांना उपचारासाठी लागणारी अत्याधुनिक यंत्रसामग्री पुरविली आहे. गाेरगरीब जनतेला औषधे तसेच चाचण्यांसाठी पैसे खर्च करण्याची वेळ येऊ नये, यासाठी त्यांनी आता रुग्णालयांना औषधे पुरविण्यास सुरुवात केली आहे. आ. सावंत यांनी परंडा काेराेनावरील औषधे पुणे येथून मागवून उपजिल्हा रुग्णालयाकडे सुपूर्द केली. ‘काेराेना टेस्टिंग वा औषधांवर माझ्या जनतेचा एक रुपयाही खर्च हाेता कामा नये. यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते करू. जनतेने घाबरून न जाता संकटाचा नेटाने सामना करावा’, अशा शब्दांत आ. सावंत यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, जि. प. उपाध्यक्ष धनंजय सावंत, जि. प. सभापती दत्ता आण्णा साळुंखे, रामचंद्र घोगरे, शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, कोविड केंद्रप्रमुख डॉ.अबरार पठाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जहूर सय्यद. डाॅ. शेख, नगरसेवक रत्नकांत शिंदे, डॉ. चेतन बोराडे आदींची उपस्थिती हाेती.