टाकळी येथील दोन दिवसांपासून शाळा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 04:34 AM2018-06-20T04:34:51+5:302018-06-20T04:34:54+5:30
मुख्याध्यापकाची बदली रद्द करावी, या मागणीसाठी परंडा तालुक्यातील टाकळी येथील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
आंदोरा (जि. उस्मानाबाद) : मुख्याध्यापकाची बदली रद्द करावी, या मागणीसाठी परंडा तालुक्यातील टाकळी येथील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही शाळा बंदच ठेवण्यात आली.
येथे १ ली ते ६वीपर्यंत शाळा असून, १११वर पटसंख्या आहे़ यंदा वाढीव ७वीच्या वर्गाला मान्यता मिळाली आहे़ शाळेची गुणवत्ता वाढविण्यासह मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी तत्कालीन मुख्याध्यापक सुमंत उमाप यांनी शिक्षक, ग्रामस्थांसोबत घेऊन मोठे काम केले आहे़
मात्र, चालू शैक्षणिक वर्षात मुख्याध्यापक उमाप यांची बदली झाल्याची माहिती मिळताच पालकांनी या बदलीला विरोध दर्शविला़