हरवलेल्या ११ मोबाइलचा लागला शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:29 AM2021-03-14T04:29:13+5:302021-03-14T04:29:13+5:30
उस्मानाबाद : मोबाइल फोन हरवल्यासंदर्भात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल तक्रारींपैकी ११ मोबाइल फोन सायबर पोलिसांच्या मदतीने शोधून काढण्यास ...
उस्मानाबाद : मोबाइल फोन हरवल्यासंदर्भात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल तक्रारींपैकी ११ मोबाइल फोन सायबर पोलिसांच्या मदतीने शोधून काढण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यामार्फत या फोनचा ऑनलाइन शोध घेण्याचे काम सुरू असते. अशाच प्रकरणातील ११ मोबाइल फोन हे इतरत्र वापरात असल्याचे सायबर पोलिसांच्या निदर्शनास आले. या मोबाइल फोन वापरणाऱ्या व्यक्तींची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला दिल्यानंतर पो.नि. गजानन घाडगे यांच्या पथकाने वापरकर्त्यांशी संपर्क साधून त्यांच्या ताब्यातून हे फोन जप्त केले. शनिवारी हे फोन संबंधित मालकांना परत करण्यात आले.
या वेळी मोबाइल मालक मधुकर निंबाळकर, दयानंद राठोड, पांडुरंग माने, कृष्णा जाधव, फिरोज पठाण, राजेंद्र मगर, महादेवी साठे, अनिल पुदाते, प्रकाश इंगळे, संजय पाटील, भाग्यश्री गवळी उपस्थित होते. ही मोहीम पो.उप.नि. सदानंद भुजबळ, क्रांती ढाकणे, पो.कॉ. बलदेव ठाकूर, सायबर पोलीस ठाण्याचे पो.उप.नि. योगेश पवार, पो.कॉ. सुनील मोरे, अरविंद ढेकणे यांच्या पथकाने केली.