कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १५ डॉक्टर, २५ कर्मचारी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:32 AM2021-04-25T04:32:20+5:302021-04-25T04:32:20+5:30

उस्मानाबाद : पाहिली लाट ओसरते ना ओसरते तोच दुसरी लाट धडकली. ही लाट पहिल्या लाटेपेक्षा तीव्र स्वरूपाची आहे. या ...

In the second wave of corona, 15 doctors, 25 staff positive | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १५ डॉक्टर, २५ कर्मचारी पॉझिटिव्ह

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १५ डॉक्टर, २५ कर्मचारी पॉझिटिव्ह

googlenewsNext

उस्मानाबाद : पाहिली लाट ओसरते ना ओसरते तोच दुसरी लाट धडकली. ही लाट पहिल्या लाटेपेक्षा तीव्र स्वरूपाची आहे. या संकटात महत्त्वाची भूमिका बजावणारे आरोग्य यंत्रणेचे कर्मचारीही मोठ्या प्रमाणात बाधित निघू लागले आहेत. आजवर १५ डॉक्टर व २३ ते २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट दाखल झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात शंभर ते सव्वाशे रुग्ण आढळून येत होते. ही लाट थोपविण्यासाठी फ्रंटलाईन वर्कर असलेले आरोग्य कर्मचारी जीवाचे रान करीत आहेत. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक तीव्र असल्याने कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या लाटेत एकट्या जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत येणारी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील सुमारे १५ डॉक्टर तसेच २३ ते २५ अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील काही क्रिटिकल आहेत. तर काही औषधोपचार घेऊन घरी परतले आहेत.

चौकट...

कामकाजावर होतोय परिणाम....

जिल्हातील काही आरोग्य केंद्र अशी आहेत, जेथे डॉक्टरसह इतर काही कर्मचारीही पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आशा केंद्रात येणाऱ्या रुग्णांना कोणी तपासायचे, औषधी कोणी वितरित करायची, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशावेळी अन्य केंद्रातील कर्मचाऱ्यांकडे चार्ज द्यावा लागत आहे. परिणामी कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे.

कोट...

कोरोनाची दुसरी लाट तीव्र स्वरूपाची आहे. कर्तव्य बजावताना आरोग्यचे डॉक्टर, इतर कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात बाधा होत आहे. आजवर १५ डॉक्टर, २३ कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत.

-डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.

Web Title: In the second wave of corona, 15 doctors, 25 staff positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.