‘तेरणा अभियांत्रिकी’च्या ५ विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:25 AM2020-12-26T04:25:11+5:302020-12-26T04:25:11+5:30
उस्मानाबाद : येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडलेल्या कॅम्पस मुलाखतीत सीएससी व ईटीसी विभागातील १३ विद्यार्थ्यांना आपले कौशल्य सिद्ध ...
उस्मानाबाद : येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडलेल्या कॅम्पस मुलाखतीत सीएससी व ईटीसी विभागातील १३ विद्यार्थ्यांना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली. यातील आकाश उंबरे-पाटील, पूजा सूर्यवंशी, समर्थ सुरवसे, प्राजक्ता तुपारे, मोमीन सैफुद्दीन या ५ विद्यार्थ्यांची निवड झाली. यावेळी कंपनीचे संचालक शिवशंकर झोरी, सिनिअर डेटा ॲनालिस्ट स्वप्निल हरवले, सिनिअर बिझनेस डेव्हलपमेंट दीपक पाटील यांनी मुलाखती घेतल्या.
या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. पदमसिंह पाटील, आ. राणाजगजितसिंह पाटील, व्यवस्थापकीय समनवयक प्रा. एम. डी. पाटील, प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांच्यासह विभाग प्रमुखांनी काैतुक केले. मुलाखतीसाठी प्रा. पी. एम. पवार, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, रामेश्वर मुंढे यांनी प्रयत्न केले.
फोटो कॅप्शन : उस्मानाबाद येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी कंपनीचे अधिकारी शिवशंकर झोरी, स्वप्निल हरवले, दीपक पाटील, प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांच्यासह यशस्वी विद्यार्थी.