ज्यादा दराने धान्य विक्री करणे भोवले; लोहाऱ्यात दोन राशन दुकानांचे परवाने रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 06:38 PM2020-04-11T18:38:47+5:302020-04-11T18:40:28+5:30

धान्य दुकान क्र १ व २ ची परवाने रद्द

Sell grain at a higher rate; Two ration shop licenses canceled in Lohara | ज्यादा दराने धान्य विक्री करणे भोवले; लोहाऱ्यात दोन राशन दुकानांचे परवाने रद्द

ज्यादा दराने धान्य विक्री करणे भोवले; लोहाऱ्यात दोन राशन दुकानांचे परवाने रद्द

googlenewsNext

लोहारा (जि.उस्मानाबाद) : लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथील स्वस्त धान्य दुकान क्रमाक २ व ३ हे अतिरीक्त दराने धान्य विक्री करत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर तहसिलदारांनी दोन्ही दुकानाच्या परवाना निलंबनाची  कार्यवाही करण्यात आली आहे. यामुळे आता तालुक्यात जादा दरांने धान्य विक्री करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. 

गोरगरिबांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध व्हावे, हा मूळ हेतू डोळ्यापुढे ठेवून राज्यभरात स्वस्त धान्य दुकानांचे जाळे विणण्यात आले असले. तरी या योजनेचा फायदा गरजू आणि गरिबांना होण्याऐवजी तालुक्यातील आष्टाकासार येथील  दुकानचालक जास्त भावाने विक्री करत असल्याचे व पावती देत नसल्याच्या तसेच या बाबत दिलेल्या‍ तक्रारी मध्ये आष्टाकासार येथील दुकानदार दुकान क्रमाक २ व ३ चे मालक मल्लीनाथ सोलापुर हे रेशनकार्ड धारकांना वाढीव दरांने धान्‍य देत आहेत. पावतीही देत नाहीत. याबाबत नागरीकांनी वांरवार ग्रामपंचायतीकडे तक्रार केली परंतु कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे दिसु आले होते. असे देण्यात आलेल्या निवेदनामध्ये नमुद करण्याबत आले होते. 

ग्राम दक्षता समितीचे तथा सरपंच सुनिल सुलतानपुरे, सदस्य सचिव तथा तलाठी विनायक आवारी यांच्या समितीच्या, सदस्यानी शनिवारी प्रत्यक्ष धान्य  दुकानात जाऊन पंचनामा केला होता. त्यायमध्येच दुकान क्र. २ व ३ लायसन्स निलंबीत करण्याची शिफारस करण्यात आली होती.त्या अनुषंगाने तहसिलदार विजय अवधाने यांनी या दोन्ही स्वस्त धान्य दुकानावर निलंबनाची कार्यवाही केली आहे. 

अशा प्रकारच्या स्वस्त धान्य  दुकानदाराच्या तक्रारी येत असतील तर तहसिलदार विजय अवधाने यांनी पुरवठा नियंत्रण कक्ष तहसील कार्यालय येथील अव्वल कारकुन यु.वी. मुदीराज यांच्याशी संपर्क करण्यायचे आवाहन केले आहे.

Web Title: Sell grain at a higher rate; Two ration shop licenses canceled in Lohara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.