कालबाह्य ॲम्ब्युलन्सचा शासनाकडे प्रस्ताव पाठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:32 AM2021-03-05T04:32:27+5:302021-03-05T04:32:27+5:30
जिल्हा परिषद-सीईओंनी दिले आराेग्य अधिकाऱ्यांना आदेश उस्मानाबाद : ‘कालबाह्य ॲॅम्ब्युलन्समधून रुग्ण, मातांची वाहतूक’, या मथळ्याखाली ‘लाेकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर ...
जिल्हा परिषद-सीईओंनी दिले आराेग्य अधिकाऱ्यांना आदेश
उस्मानाबाद : ‘कालबाह्य ॲॅम्ब्युलन्समधून रुग्ण, मातांची वाहतूक’, या मथळ्याखाली ‘लाेकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांनी आराेग्य विभागाची तातडीने बैठक घेतली. प्रत्येक आराेग्य केंद्राच्या ॲॅम्ब्युलन्सचा आढावा घेऊन तातडीने शासनाला प्रस्ताव पाठविणाचे आदेश दिले. ही बाब गंभीर असल्याचे मतही त्यांनी यावेळी नाेंदविले.
ग्रामीण भागातील रुग्णांसह मातांना तातडीने जिल्हा, उपजिल्हा तसेच ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्राथमिक आराेग्य केंद्रांच्या ॲॅम्ब्युलन्सला प्राधान्य दिले जाते; परंतु सध्या ४० पैकी जवळपास ५० टक्के ॲॅम्ब्युलन्स कालबाह्य झाल्या आहेत. यातील चाैदा ॲॅम्ब्युलन्स कालबाह्य झाल्या आहेत, तर ६ ॲॅम्ब्युलन्समध्ये बिघाड निर्माण हाेत आहे. असे असतानाही सदरील वाहने आराेग्य विभागाच्या ताफ्यातून बाहेर काढण्यात आलेली नाहीत. रुग्णांना सेवा देण्याचे काम सुरूच आहे. हे थाेडके म्हणून की काय, यातील एकही ॲॅम्ब्युलन्सचा इन्शुरन्स काढलेला नाही. या माध्यमातून शासनकर्ते रुग्णांच्या जीविताशी खेळत आहेत. रुग्णांची ही धाेकादायक वाहतूक ‘लाेकमत’ने समाेर आणल्यानंतर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. फड यांनी आराेग्य विभागाची तातडीने बैठक घेतली. त्यांनी केंद्रनिहाय आढावा घेतला. यातून विदारक वास्तव समाेर आल्यानंतर सीईओ डाॅ. फड यांनी तातडीने शासनाला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. हणमंत वडगावे यांना दिले.