शिवसेनेच्या वतीने भातागळी मोड येथे विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:33 AM2021-05-27T04:33:40+5:302021-05-27T04:33:40+5:30
तालुक्यातील भातागळीसह परिसरातील कानेगाव, नागूर, कास्ती (बु.), कास्ती (खु.) आदी गावांत मागील आठ ते दहा दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत ...
तालुक्यातील भातागळीसह परिसरातील कानेगाव, नागूर, कास्ती (बु.), कास्ती (खु.) आदी गावांत मागील आठ ते दहा दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या परिसरात १५० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आल्याने या भागात विलगीकरण कक्ष सुरू करण्याची गरज होती. त्याअनुषंगाने नागरिकांतून मागणी करण्यात येत होती. ही बाब लक्षात घेत आ. ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या पुढाकारातून व भातागळी येथील संत शिरोमणी मारुती महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्यातून तसेच कानेगाव, नागूर, भातागळी, कास्ती (बु.), कास्ती (खु) या ग्रामपंचायतींच्या मदतीने भातागळी मोड येथील संत मारुती महाराज आश्रमशाळेत शिवसेनेच्या वतीने विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली.
बुधवारी याचे लोकार्पण आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तहसीलदार संतोष रुईकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, संत मारुती महाराज आश्रमशाळेचे अध्यक्ष बालाजी मेनकुदळे, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, बाबूराव शहापुरे, तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नागन्ना वकील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुख सुनील साळुंके, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक अभिमान खराडे, श्याम नारायणकर, कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, नागूरचे सरपंच गजेंद्र जाधव, कास्ती (बु.) चे सरपंच परवेज तांबोळी, कास्ती (खु.) चे सागर पाटील, भातागळीचे सरपंच हणमंत कारभारी, महेबूब गवंडी, सुधीर घोडके, जालिंदर कोकणे, प्रताप लोभे, नेताजी शिंदे आदी उपस्थित होते.