शेतात सापडला साडेसात फुटी अजगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:35 AM2021-08-22T04:35:27+5:302021-08-22T04:35:27+5:30

उमरगा तालुक्यातील कर्नाटक सीमेलगतचा भाग डोंगराळ व जैवविविधता आढळून येणारा आहे. याच भागात वसलेल्या मळगीवाडी या गावातील शिवारात दत्तात्रय ...

A seven-and-a-half foot dragon was found in the field | शेतात सापडला साडेसात फुटी अजगर

शेतात सापडला साडेसात फुटी अजगर

googlenewsNext

उमरगा तालुक्यातील कर्नाटक सीमेलगतचा भाग डोंगराळ व जैवविविधता आढळून येणारा आहे. याच भागात वसलेल्या मळगीवाडी या गावातील शिवारात दत्तात्रय औरादे यांच्या शेतात शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास साडेसात फुटाचा नर अजगर आढळून आला. यावेळी येथील काही तरुणांनी उमरगा शहरातील शिवराज गायकवाड या सर्पमित्रास संपर्क साधून अजगर सापडल्याची माहिती दिली. यावरून सर्पमित्र शिवराज गायकवाड व अतुल चव्हाण, चैतन्य पांचाळ, युवराज गायकवाड, निसार मुल्ला, इमरान शेख यांनी शेतात जाऊन मोठ्या शिताफीने या अजगरास पकडले व वनविभागास याची खबर देऊन उमरगा येथील वनविभागाच्या कार्यालयात या अजगरास सुपुर्द केले. यावेळी वनविभागाचे वनरक्षक तुकाराम डिगोळे यांनी हा अजगर ताब्यात घेतला व नंतर त्यास सायंकाळी ज्या भागात पकडले होते त्यालगत असलेल्या वनविभागाच्या धाकटेवाडीच्या जंगलात सोडून देण्यात आले.

कर्नाटक सीमेलगत उमरगा तालुक्याच्या हद्दीत डोंगराळ भागात वन्यजिवांचा मोठा वावर सातत्याने आढळून आलेला आहे. परंतु, वनविभागाच्या दुर्लक्षामुळे या भागात शिकारीचे प्रमाण वाढले आहे. या भागात घोरपड, साप, अजगर, ससे, हरणे, मोर, कोल्हे व इतर वन्यजीव असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे वनविभागाने या भागात या जीवाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करून शिकारीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींतून होत आहे.

Web Title: A seven-and-a-half foot dragon was found in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.