भिंत काेसळून सात शेळ्या दगावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:39 AM2021-09-07T04:39:15+5:302021-09-07T04:39:15+5:30
पाथरुड : सततच्या पावसामुळे घराची भिंत काेसळून जवळपास सात शेळ्या दगावल्या, तर तीन शेळ्या जखमी झाल्या आहेत. ही घटना ...
पाथरुड : सततच्या पावसामुळे घराची भिंत काेसळून जवळपास सात शेळ्या दगावल्या, तर तीन शेळ्या जखमी झाल्या आहेत. ही घटना ६ सप्टेंबरच्या रात्री दीड वाजेच्या सुमारास भूम तालुक्यातील तिंत्रज येथे घडली. संबंधित कुटुंबाचा उदरनिर्वाह शेळीपालनावर अवलंबून हाेता. त्यामुळे हे कुटुंब आर्थिक अडचणीत आले आहे.
भूम तालुक्यातील पाथरूडसह परिसरात मागील दाेन ते तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. साेमवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जाेरदार पाऊस सुरू असतानाच, तिंत्रज येथील कैलास उत्तम गिरी यांच्या घराची भिंत ढासळली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेत तीन शेळ्या व चार पिल्ले ठार झाली, तर दाेन शेळ्या व एक करडू जखमी झाले. घराच्या दाेन्ही बाजूच्या भिंती काेसळल्याने संसाराेपयाेगी साहित्याचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, गिरी कुटुंबाचा उदरनिर्वाह केवळ शेळीपालनावर अवलंबून हाेता. या शेळ्याच दगावल्याने आता उदरनिर्वाह भागवायचा कसा, असा सवाल त्यांना पडला आहे.
प्रतिक्री...
शेळी पालनावरच माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत हाेता, परंतु घराची भिंत ढासळल्याने शेळ्या दगावल्या आहेत. आता कुटुंब चालवायचे कसे, असा प्रश्न माझ्यासमाेर आहे. प्रशासनाकडून मदत मिळावी.
- कैलास गिरी, तिंत्रजय.