जीप विकण्याच्या बहाण्याने सात लाखाची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 08:21 PM2019-03-01T20:21:28+5:302019-03-01T20:24:26+5:30
या प्रकरणी चौघाविरूध्द गुरूवारी वाशी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
वाशी (जि. उस्मानाबाद) : जीप विकण्याच्या बहान्याने एकाला बोलावून घेत ६ लाख ९२ हजाराची रोकड व इतर साहित्य असा ७ लाख ४ हजार ७०० रूपयांचा ऐवज लूटण्यात आला़ ही घटना रविवारी दुपारी भूम तालुक्यातील आंद्रूड गावाजवळ घडली असून, या प्रकरणी चौघाविरूध्द गुरूवारी वाशी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शिरूर कासार तालुक्यातील पाडळी येथील प्रशांत साहेबराव पाखरे यांना रविवारी दुपारी चौघांनी पाहुण्याची जीप विकायची आहे, असे म्हणून भूम तालुक्यातील आंद्रूड गावाजवळील पुलावर बोलावून घेतले़ पाखरे पुलावर आले असता चौघांनी त्यांना धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी देत बॅगेतील ६ लाख ९२ हजार रूपये, एक पाच हजार रूपयांचा मोबाईल, ४२०० रूपयांचे चांदीचे ब्रासलेट, खिशातील रोख ३५०० रूपये व इतर कागदपत्रे असा एकूण ७ लाख ४ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार प्रशांत पाखरे यांनी वाशी पोलीस ठाण्यात दिली़ पाखरे यांच्या तक्रारीवरून रयास भोसले, लाला काळे व दोन महिलांविरूध्द (सर्व रा़ईट ता़भूम) गुरूवारी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़