सात माेबाईल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:24 AM2021-06-02T04:24:45+5:302021-06-02T04:24:45+5:30
केशेगाव येथून दुचाकी लंपास उस्मानाबाद -तालुक्यातील केशेगाव येथील प्रमाेद प्रभाकर काेळगे यांनी आपली दुचाकी (क्र. एमएच. १३-एएस. ३२७९) ३१ ...
केशेगाव येथून दुचाकी लंपास
उस्मानाबाद -तालुक्यातील केशेगाव येथील प्रमाेद प्रभाकर काेळगे यांनी आपली दुचाकी (क्र. एमएच. १३-एएस. ३२७९) ३१ मार्चच्या रात्री घरासमाेर उभी केली हाेती. आजूबाजूला काेणीही नसल्याची संधी साधत अज्ञाताने दुचाकी लंपास केली. ही घटना दुुसऱ्या दिवशी उघडकीस आल्यानंतर बेंबळी पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात चाेरट्यांविरूद्ध भादंसंचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.
अवैध दारू विक्री, गुन्हा दाखल
उस्मानाबाद - तालुक्यातील रामवाडी येथील दारूअड्ड्यावर बेंबळी पाेलिसांनी ३० मे राेजी छापा मारला. या कारवाईत देशी दारूच्या तीस बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी पाेलिसांनी अविनाश अनिल माने यांच्याविरूद्ध बेंबळी ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
विनामास्क वावरणे भाेवले
उस्मानाबाद - काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. असे असतानाही अनेकजण मास्कविना वावरत आहेत. अशा लाेकांविरूद्ध पाेलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या विविध भागात ३१ मे राेजी १६ जणांविरूद्ध बडगा उगारण्यात आला. त्यांच्याकडून दंडापाेटी ८ हजार रूपये वसूल करण्यात आले आहेत.