जिल्ह्यातील सात तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:43 AM2021-06-16T04:43:28+5:302021-06-16T04:43:28+5:30

तालुकानिहाय रुग्णसंख्या.. उस्मानाबाद : ४९८ तुळजापूर : ३४ उमरगा : ३५ लोहारा : ३१ कळंब : २७ वाशी : ...

Seven talukas of the district are on the path of coronation | जिल्ह्यातील सात तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर

जिल्ह्यातील सात तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर

googlenewsNext

तालुकानिहाय रुग्णसंख्या..

उस्मानाबाद : ४९८

तुळजापूर : ३४

उमरगा : ३५

लोहारा : ३१

कळंब : २७

वाशी : ३१

भूम : २४

परंडा : ३८

आतापर्यंत झालेल्या चाचण्या : ३३३९१६

बाधित होण्याचे प्रमाण : १७.०६ टक्के

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण : ८६.४० टक्के

कोट...

जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणेसह सर्वच विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी १० पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या गावांवर विशेष लक्ष केंद्रित करून तेथील तपासण्या व अन्य उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या. माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या सर्वेक्षणातून समोर आलेल्या गंभीर आजारी नागरिकांना वेळेत उपचार देता आले. तसेच जाणीवजागृती, कोविड नियमांचे पालन, गावोगाव निर्माण झालेले आयसोलेशन सेंटर्सचीही संसर्ग नियंत्रणात आणण्यात मोठी मदत झाली. संसर्ग आटोक्यात येत असला तरी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

-डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी

एकूण रुग्ण : ५६७६१

बरे झालेले रुग्ण : ५४७१७

उपचाराधीन रुग्ण : ७१८

मृत : १३२६

कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर तालुके : ७

उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक रुग्ण...

सुरुवातीपासूनच उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. सर्वात मोठा तालुका असल्याने व लोकसंख्येची घनता, तसेच शहराशी असणारा संपर्क, वर्दळ या कारणांमुळे उस्मानाबाद तालुका रुग्णसंख्येच्या बाबतीत आघाडीवर आहे.

Web Title: Seven talukas of the district are on the path of coronation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.