विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये सातजण कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:32 AM2021-04-25T04:32:26+5:302021-04-25T04:32:26+5:30

उमरगा : शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत असतानाही काहीजण विनाकारण बाहेर फिरत आहेत. यांना लगाम घालण्यासाठी प्रशासनाने शुक्रवारपासून शेवटचा पर्याय ...

Seven of the unruly wanderers infected the corona | विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये सातजण कोरोना बाधित

विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये सातजण कोरोना बाधित

googlenewsNext

उमरगा : शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत असतानाही काहीजण विनाकारण बाहेर फिरत आहेत. यांना लगाम घालण्यासाठी प्रशासनाने शुक्रवारपासून शेवटचा पर्याय म्हणून अशा रिकामटेकड्यांना पकडून त्याच ठिकाणी कोरोना चाचणी सुरू केल्याने विनाकारण फिरणाऱ्यांची एकच धांदल उडाली आहे. शहरात शुक्रवारी व शनिवारी दोन दिवसांत एकूण शंभर लोकांची तपासणी केली असता यात सात जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास भारत विद्यालय कॉम्प्लेक्स समोरील महामार्गावर आरोग्य नगरी कॉर्नरवर ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी रॅपिड टेस्ट करण्यासाठी आरोग्य नगरीला जाणाऱ्या कॉर्नरला टेंट मारण्यात आला होता. यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले,उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले, तहसीलदार संजय पवार, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य पथक, नगर परिषदेचे कर्मचारी व पोलीस पथक उपस्थित होते. ही मोहीम सुरू असताना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी भेट देऊन माहिती घेतली व सूचना केल्या.

यावेळी रस्त्यावर फिरणाऱ्या पादचारी, दुचाकी व इतर वाहनांतील व्यक्तींना थांबवून चौकशी करून समाधानकारक उत्तरन दिल्यास त्यास कोरोनाची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येत होती. याची माहिती शहरभर झाल्यावर थोड्याच वेळात महामार्गासह शहरातील सर्वच रस्ते सामसूम झाले होते. दरम्यान, यापुढेही हे तपासणी केंद्र कार्यान्वित राहणार आहे. या मोहिमेत शुक्रवारी ४७ जणांची तपासणी केली यात दोघे तर शनिवारी ५३ लोकांच्या चाचणीत पाच असे एकूण सातजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Seven of the unruly wanderers infected the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.